पीएम्इंडिया
मोठया संख्येने उपस्थित माझ्या बंधु आणि भगिनींनो,
काश्मिरच्या भूमीवर सर्वात जास्त येण्याचे सौभाग्य जर कोणत्या पंतप्रधानाला मिळाले असेल, तर ते मला मिळाले आहे. काश्मिर मला येथे खेचून आणतो. मी काश्मिरींचे प्रेम अनुभवले आहे.मी जेव्हा भारतीय जनता पक्षाचे काम बघत होतो, तेव्हा येथे कित्येक वेळा आलो आहे. दुर्गम क्षेत्रात जाण्याचे सौभाग्य मला मिळाले, येथील प्रेम अनुभवायला मिळाले. याच प्रेमास्तव, जेव्हा जम्मु-काश्मिरमध्ये पूर आला होता, तेव्हा त्यांच्या वेदना मला दिल्लीमध्ये होत होत्या. त्यामुळेच, मी त्वरित येथे आलो.त्या वेळच्या सरकारसोबत खांदयाला खांदा लावून मी तुमच्या दु:खात सहभागी झालो.
दिवाळीच्या सण आल्यानंतर, माझ्यासाठी दिल्लीमध्ये माझ्या मित्रांसोबत दिवाळी साजरे करणे सोपे होते. पण माझ्या मनात असे आले की दिवाळी साजरी करण्याऐवजी ज्या भूमीवरील लोक आत्ताच संकटापासून वाचले आहेत, त्या श्रीनगरमध्ये मी जावे. जेव्हा येथे नेसर्गिक संकट आले तेव्हा चीनचे राष्ट्रपती भारत दौ-यावर आले. त्यांनी 17 सप्टेंबर अशा तारखेला माझ्या गृहराज्यात गुजरातमध्ये येण्याचे ठरवले. 17 सप्टेंबर माझा वाढदिवस असल्याने त्यांनी ही तारीख ठरवली व चीनचे राष्ट्रपती मोठया उत्साहाने माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. पण, मी तेव्हाच घोषित केले की, काश्मिरमधील पुरामुळे माझे बांधव पिडीत आहेत, मी माझा वाढदिवस साजरा करू शकणार नाही. मी त्यांचे स्वागत केले, त्यांचा सन्मान केला पण वाढदिवस साजरा करण्यास नकार दिला. मी माझ्या आईचे आर्शीवाद घ्यायला गेलो. मी ज्या सामाजिक परिवेशात जन्मलो तिथे माझी आई माझ्या वाढदिवसानिमित्त नेहमी सव्वा रूपये कधी 5 रूपये, कधी जास्तीत जास्त 11 रूपये मला देत असे 11 रूपये पेक्षा जास्त पैसे माझ्या आईने कधी दिले नाही. पण, ज्या दिवशी मी तेथे गेलो तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. संस्काराची ही भावना माझ्या रक्तात भिनली आले. माझ्या आईने माझ्या वाढदिवसानिमित्त मला 5000 रूपये दिले व सांगितले, बेटा हे पैसे काश्मीर मधल्या पूरग्रस्तांसाठी घेऊन जा. ही संस्काराची ताकद मला तुमच्या दु:ख वेदना दूर करण्यासाठी प्रेरणा देते.
तुमचे प्रेम माझा निश्चय निर्धार दृढ करतो. आमच्या सरकारने ‘सबका-साथ-सबका-विकास’ हा मंत्र अंगिकारलेला आहे. भारतातील कोणताही भाग विकासापासून वंचित राहत असेल, तर माझे हे स्वप्न साकार होणार नाही. त्यासाठीच, भारतातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक भू-भाग प्रत्येक नागरिक यांच्या विकासासाठी त्यांची साथ आम्हांला हवी. या स्वप्नाची पूर्तताकरण्याठी मला जम्मु-कश्मीर मध्ये भारताच्या या भूमीवर येण्यासाठी पागल करणारे दिवस आणायचे आहेत. या मातीचा सुगंध घेण्यासाठी उत्सुक करणारे दिवस मला आणायचे आहेत. थोडे पैसे वाचले की कुटुंबाचे एक स्वप्न होते की ते सुट्टीमध्ये काश्मिरला जातील. केरळ, तामिळनाडू, आसाम, नागालँड, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतील परिवाराचे स्वप्न असायचे पैसे वाचवून पुढील वर्षी काश्मिर मध्ये पर्यटन करायचे , मला ते दिवस परत आणायचे आहेत.
सव्वाशे कोटी भारतीयांमध्ये मला काश्मिरच्या या वातावरणात येऊन आपल्या प्रेमाचा अनुभव, सेवावृत्तीचा अनुभव व निसर्गाच्या या अलौकिक सौंर्दयाचा आस्वाद घेण्याचा उत्साह व इच्छा निर्माण करण्याचे माझे स्वप्न आहे. संकटानंतर पुन्हा उभे राहता येत नाही, असे कोण म्हणणार. मी स्वत:च्या आयुष्यात असे बघितले की, संकट किती पण मोठे असले तरी त्या संकटावर मात करण्यासाठी एक उमेद लागते व तेच आपल्याला जगण्याची आशा देते.
2001 मध्ये गुजरातमध्ये जेव्हा भयंकर भूकंप आला होता, तेव्हा मृत्युची चादरच आमच्यावर ओढल्या गेली. सर्व जगाला असे वाटले की, गुजरात आता पुन्हा उभा राहणार नाही. हजारो लोक मृत्युमुखी पडले, घरे बर्बाद झाली, पुर्ण अर्थव्यवस्था ढेपाळली व सर्व स्वप्ने उद्धवस्त झाली. अश्रु पुसायला कोणी नव्हते. मी ते सर्व बघितले व या परिस्थितीमधून गुजरातला बाहेर काढण्याचा माझ्या मनाशी पक्के बांधले, बंधुभगिनींनो, जागतिक बँक असे सांगते की, अशा भयानक भूकंपानंतर जर त्या राज्याला चहुबाजुंनी मदत मिळाली तरी, त्याला बाहेर पडण्यासाठी 7 वर्षापेक्षा कमी वेळ लागत नाही. पण, आम्ही अशा योजना आखल्या ज्यामुळे 3 वर्षाच्या आतच भूकंपगस्त क्षेत्रामध्ये विकासाच्या नव्या उंची गाठत आल्या. कच्छ, जिल्हा जो भूकंपग्रस्त होता तो भारतातील सर्वात जास्त गतीने विकसित होणा-या जिल्हांध्ये गणला जातो. म्हणुन, मला असे म्हणायचे आहे की काश्मीरने खुप संकट सहन केले. दोन-दोन पीढीच्या युवकांचे स्वप्न उद्धवस्त झाली आहेत. पण मला विश्वास आहे की, माझे काश्मिर पुन्हा त्याच उमेदीने, त्याच उत्साहाने उभे राहिल. मी फक्त असे स्वप्नच बघत नाही तर याशस्वी पाऊले उचलत त्यांना साकार करण्याचा प्रयत्न मी करत आहे.
17 महिन्यापूर्वी भारतातील कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये,यु-टयुबवरच्या न्युज्-डिबेटमध्ये व विश्वभरातल्या कोणत्याही एंजेसीच्या आवाजात आपल्याला भारत आता बर्बाद झाला आहे. भारत वाचु शकत नाही, भारत विध्वसांच्या जवळ पोहचला आहे, आर्थिक स्थिती, भष्ट्राचार, कुशासन, परिवारवाद अशा कित्येक विकारांमुळे भारत बर्बाद झाला आहे, असा स्वर आपला 17 महिन्याआधी ऐकू येत होता. पंरतु आता 17 महिन्यानंतर जगभरातील सर्व देशांमध्ये वेगाने प्रगती करणा-या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचे नाव गणले जाते.
भारताची तुलना कधी काळी चीनसोबत करण्याची कोणी हिंमत करत नव्हते. कारण, चीन आपल्यापुढे निघून गेला होता. आज भारताच्या विकासाची, आर्थिक विकासाची जेव्हा पण चर्चा होते तेव्हा प्रत्येक वेळी त्याची तुलना चीन सोबत केली जाते व प्रत्येक वेळी भारत चीनपेक्षा पुढे निघून जातो. हे सर्व 17 महिन्यात होऊ शकले.
जगातील देशामध्ये कोणत्या देशामध्ये भष्ट्राचाराची स्थिती काय आहे ? भष्ट्राचार वाढत आहे की कमी होत आहे ? या सर्वांचा हिशेब मांडणारा “ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल” या संस्थेचा अहवाल मी आज वाचत होतो. त्यानुसार गेल्या 50 वर्षामध्ये पहिल्यांदा पारदर्शकतेच्या, संदर्भात, भष्ट्राचार मुक्तीच्या व भष्ट्राचार निर्मूलनच्या दिशेने भारत चीनपेक्षा दहा स्थान यशस्विरित्या पुढे गेला आहे. जगात आपला क्रमांक 95 वर होता, हा अहवाल आल्यानंतर आम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे, 95 वरून 85 व्या क्रमांकावर आपण पोहचलो. 17 महिन्याच्या आत भष्ट्राचाराविरूद्ध इतका मोठा संघर्ष करून भारत पुढे जातो. एकदा भारत निर्णय घेतो तो घेतोच.
बंधु, भगिनींनो, भारताची ही वृत्ती काश्मिर पेक्षा वेगळी असू शकत नाही. मुफ्ती साहेब आता सांगत होते की, येथील लोकांमध्ये जी उमेद आहे, तिला थोडी व्यवस्था मिळाली तर काश्मीर आपो-आपच नव्या उंची गाठेल. मला मुफ्ती साहेबांवर व आपल्यावर विश्वास आहे. 20 वर्ष इतक्या वेदना सहन केल्यानंर अशी स्थिती असणे शक्य नसते. यामुळे आपल्यात असणा-या उमेदीचा, काश्मिरला पुढे नेण्याच्या आपल्या निश्चयाचा प्रत्यय येतो.
बंधु, भगिनींनो, आम्हाला अटलजींच्या मार्गावर चालायचे आहे. काश्मिरसाठी मला जगातील कोणत्याही सल्ल्याची, विश्लेषणाची गरज नाही. याच भूमीवर, अटलबिहारी वाजपेयींनी “काश्मिरियत,जमुरियत व इन्सानियत” असा मंत्र दिला होता. याहून मोठा संदेश कोणता असूच शकत नाही. माझ्या मते आजही काश्मिरचा विकास हया तीन स्तंभावर उभा आहे. आपल्याला यास बळकटी दयायची आहे.
जेव्हा (जमुरियत) लोकशाहीची गोष्ट वाजपेयी करत होते, तेव्हा कोणाच्या लक्षातही आले नसेल की इतक्या कमी वेळेमध्ये काश्मिरचे लोक लोकशाहीवर इतका जोर देतील व लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतके भरघोस मतदान करतील. आता जेव्हा मुफ्तीसाहेब सांगतात की मी पंचायतीला अधिकार देऊ इच्छितो तेव्हा ही अटलजीची लोकशाही दिसते. एक-एका गावामध्ये पंच असेल त्याला निर्णय घेण्याचा अधिकार असेल व सरकार त्याची मदत करेल. आपला-एक न एक गाव ताकदवान बनेल हे लोकशाहीचा कस बघणारे स्वप्न अटलजींनी पाहिले होते, ते काश्मिरच्या लोकांनी साकार केले आहे. यासाठीच मी त्या महापुरूषाचा शब्द राखल्याबद्ल काश्मिरच्या माझ्या लाखो बंधु- भगीनीपुढे नममस्तक होतो व लोकशाहीला ही ताकद देण्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.
बंधु व भगिनींनो, काश्मीरियत शिवाय केवळ काश्मिरच नाही तर पुर्ण भारत अर्पुण आहे यामुळे व काश्मिरियत ही भारताची आन-बान-शान आहे. खरी धर्मनिरपेक्षता याच भूमीवर आहे. सुफी परंपरा-जिने एकमेकांसोबत जोडायला सांगितले ती याच भूमीवरून आली.ती परंपरा म्हणजे आमची काश्मीरियत आहे.
जग कितीही बदलले, मानवाने आकाशात घर बनविण्याचे ठरविले, तरी मानवतेशिवाय काहीच साध्य होणार नाही. जीवन कितीही पुढे गेले, तंत्रज्ञानामुळे आपण कोठच्या कोठेही पोहचलो, आर्थिक सुबत्ता आपल्याला नव्या उंचीवर घेऊन का जाईना, पण मानवता, आपल्यातील आत्मा जगवण्यासाठी व इतरांना जगण्यासाठी प्रेरणा व ताकद देते. त्यासाठीच, आपल्याला काश्मिरियत, जमुरियत व इंसानियत या सर्वांना घेऊन पुढे जायचे आहे.
बंधु व भगिनींनो, गेल्या काही दिवसात मला मुक्ती साहेबांसोबत बोलण्याची संधी मिळाली. आमच्या निर्मल सिंहजी सोबत खुप गोष्टी करण्याची संधी आम्हाला मिळाली. आमचे डागो अनेक मंत्र्यांना येथे वारंवार घेऊन येतात. या सर्वांशी ओळख झाल्यानंतर, ते विकासाचे चित्र मला वेळेच्या आत पुर्ण करायचे आहे. पुरग्रस्त शेतक-यांना, व्यापारांना सुविधा देणे, त्यांच्या मालमत्तेचे, यंत्रणेची नुकसान भरपाई देणे इत्यादीला माझे प्रथम प्राधान्य असेल. म्हणून, मी पहिल्याच दिवशी एक हजार कोटी रूपयाच्या सहाय्याची घोषणा केली. मी जम्मु काश्मिरच्या मदतीला दिल्लीला नेहमी ठेवले अशी ग्वाही मी जम्मु-काश्मिरच्या बंधु-भगिनींना देतो. फक्त अश्रु पुसणे,एखादयाचे घर दुरूस्त करणे, इतक्याने काश्मिरचे भले होणार नाही. त्या संकटात अडकून पडणे काही फायदयाचे नाही. मला जम्मु काश्मिर व लद्दाखच्या युवकांना रोजगार देण्याचे काम करायचे आहे आपल्या समस्यांचे समाधान युवकांच्या रोजगारामध्ये आहे. त्यांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे मी काश्मिरच्या युवकांचे अभिनंदन करतो. भारतामध्ये तुमचा आवाज पोहचवण्यासाठी मी तुमची मदत करणार आहे.
आजकाल आय.ए.एस., आय.पी.एस., आय.आय.एम., यासारख्या संस्थामध्ये प्रवेश घेण्यासाठी खुप परिश्रम घ्यावे लागतात. पण काश्मिरच्या युवकांनी दरवर्षी या परिक्षांमध्ये उत्तम असे प्रदर्शन केले आहे. व ते सुद्धा भारतीय प्रशासकिय व पोलिस सेवेच्या क्षेत्रात येत आहेत. आई.आई.टी. व आय.आय.एम. मध्ये दिसत आहेत. या काश्मिरच्या गुणवत्तावान युवकांच्या ताकदीला मी ओळखतो व त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.
मी जेव्हा या स्टेडियममध्ये आलो तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. 30 वर्षापूर्वी इथे एका स्टेडियममवर एक सामना खेळण्यात आला. ज्या राज्यात परवेज रसूल असेल, त्या राज्यात एक पण आंतरराष्ट्रीय सामना खेळल्या जाऊ नये ? परवेज क्रिकेट क्षेत्रामध्ये नाव आहे, आम्हाला त्याचा गर्व वाटतो. पण, या स्टेडियममवर पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना पुर्ण जगाला पाहता येई, असे स्वप्न आपण बघु शकत नाही का ? जगात आपले सचिन तेंडुलकर, सहवाग, धोनी व इतर कोणी असो, त्यांनी जर षटकार मारले असतील तर ती बॅट काश्मिरच्या भूमीतूनच बनलेली आहे. या भूमीवरचे उत्तम लाकडापासून ती बॅट बनलेली आहे. हे येथील सामर्थ्य आहे व यासाठी माझी प्राथमिकता विकासाच्या प्रारूपावर आहे, ज्यामुळे आपल्या युवकांना रोजगार मिळणार आहे.
आपल्या पर्यटन क्षेत्रात आधुनिकीकरण व संरचनेची सुव्यवस्था जो पर्यंत आपण करत नाही तोपर्यंत पर्यटनाला चालना मिळू शकत नाही. आज भारतामध्ये जवळपास पावणे दोन कोटी लोक जे खुप श्रीमंत नाहीत, पण उच्च मध्यम वर्गीय आहेत ते सुटीमध्ये पाच – सात दिवस विदेशात भ्रमंतीसाठी जात असतात.दुबईला जातात, आपण जर या पावणे दोन कोटी लोकांपैकी कमीत कमी पाच टक्के लोकांना जरी येथे काश्मिरमध्ये आणू शकलो तर पर्यटन किती वाढेल? आजकाल विदेशात पर्यटकांची संख्या जवळपास 40 ते 50 हजार असते.ही पाच लक्ष कशी होणार? येथे 12 महिनेही साहसी पर्यटन, निसर्ग पर्यटनाला वाव असतो. येथील डाल सरोवर, नौकायन इत्यादी पर्यटकांना खिळवून ठेवते. त्या सर्वाना पुर्ववत कसे चालू करता येईल, आपल्या प्रदेशात असे 3 ते 4 भाग आहेत, जी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येतात. खुप मोठया प्रमाणात आपण संरचनेद्वारे त्याचा विकास करू शकतो. यासाठी,मी त्या विकासाच्या प्रारूपाकडे जाऊन या परंपरागत ताकदीला बळ देवू इच्छितो.
आपल्याकडील पश्मिना, सफरचंद,केसर यांना वैश्विक बाजारपेठ मिळेल, त्यांचा ट्रेडमार्क विकसित करून त्यांची पॅकेजींग (वेष्टन) आकर्षक दिसेल अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आमच्या स्थानिक युवकांना, शेतक-यांना गावामध्ये रोजगार उपल्बध होईल व यासाठी कृषी क्षेत्रामध्ये अन्य राज्यांपेक्षा काश्मिरमध्ये जास्त क्षमता आहे. आम्हाला त्याला बळकट करावयाचे आहे.
आम्हाला संरचनेवर भर दयावयाचा आहे.आज जम्मूतून श्रीनगरला यायचे असेल तर 9 ते 11 तास लागतात पर्यटकांना पण वाटते की न गेलेले बरे. नितीनजींच्या नेतृत्वात जम्मू ते काश्मिर रस्ता, जो 9 ते 12 तासांचा आहे, तो नव्या भुयारी मार्गामुळे, साडे तीन ते चार तासात पोहचता येईल,असा होणार व हे काम आम्ही येत्या अडीच वर्षात पुर्ण करू या भुयारी मार्गामुळे अंदाजे 65 ते 70 किमी एवढा रस्ता कमी होणार आहे.
विकासाच्या नव्या उंची आपण कशा गाठु शकतो, याची कल्पना येते. आम्ही रेल्वेमार्गांना सशक्त करू इच्छितो. मुफ्तीसाहेब विचारत होते, चीन मध्ये बनू शकतो इथे का नाही, या काश्मिरमध्ये पण तो बनू शकतो, यासाठीच, पाणी, रस्ते असेल यांच्यासोबत केवळ हायवे चालणार नाही. हायवेची पण गरज आहे,पण केवळ हायवेने काम भागणार नाही. हायवेसोबत आपल्याला आय-वेज (इनफॉरमेशन-वे) . ऑप्टिकल फायबर जाळे , डिजीटल नेटवर्कची गरज आहे. जगासोबत जोडण्यासाठी मोबाईलचे जाळे काश्मिरच्या धरतीवर पाहिजे. युवकांना रोजगार मिळण्यासाठी कॉल सेंटरची गरज आहे. येथील युवक इंग्रजी सहजतेने बोलतात व इथे आपण जर कॉल सेंटरचे एक जाळे निर्माण केले तर आपल्या युवकांना इथे रोजगार मिळू शकतो व आम्हाला त्यावर जोर दयायचा आहे.
वृद्धांसाठी त्यांच्या आजारासाठी दवाखान्यांची औषधांची, उत्तम व्यवस्था करणे आवश्यक आहे. जम्मु, लडाख, श्रीनगर येथे आधुनिक एम्स इस्पितळ चालु करण्याचे आमचे प्रयत्न आहे. याचा लाभ जम्मुला, श्रीनगरालाही होणार आहे. आम्हाला आय.आय.टी., आय.आय.एम. चालु करून येथील युवकांना वैश्विक स्तरावरील उत्तम व स्वस्त शिक्षा उपलब्ध करायची आहे. आता सर्वांच्या नशीबात अशा संधी नसतात. लहान कुटुंब व लहान लोक असतात.त्यांनी काय करावे ? कौशल्य विकासाचे अभियान चालवून येथील हातमागाला, नव्या बुद्धीचातुर्याला, नव्या नक्षीकामाला वैश्विक बाजारपेठ उपलब्ध करून दयायची आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून हातमागामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून त्याचा विकास करणे, गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे, टाकाऊ वस्तू वाचवणे, पॅकेजिंग बदलणे, त्यांचे ब्रॅडिंग करणे, वैश्विक बाजारपेठ मिळविणे याची एक संपूर्ण श्रुंखला विकसित करून आम्हाला हातमागाला प्रोत्साहन दयायचे आहे.
बंधु, भगिनींनो उत्तम शिक्षण, मानव संसाधन, वृद्धांचे स्वास्थ्य विकास व इतर गरजा, गाव व शेतकऱ्यांसाठी उत्पादनाला चालना, युवकांना रोजगार, या सर्वांवर आम्ही जोर देणार आहोत. याचे स्वप्न सकार करण्यासाठी भारत सरकारने जम्मू काश्मिरसाठी 80 हजार कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.
हे 80 हजार कोटी रुपयाचे पॅकेज,माझी मनापासून इच्छा आहे की, माझ्या युवकांच्या भविष्यासाठी , त्यांना ताकद देण्यासाठी, एका आधुनिक प्रगतीशील जम्मु काश्मिरच्या जडण-घडणीसाठी कामी यावे. बंधु व भगिनींनो, या 80 हजार कोटी रूपयांना पूर्ण विराम समजू नका ही तर फक्त सुरूवात आहे. मी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या तुम्ही पूर्ण करून दाखवा. हा दिल्लीचा खजीना तुमच्यासाठी आहे व दिल्लीचा खजिनाच नाही तर हे दिल (हृदय) पण आपलेच आहे, बंधु – भगिनींनो.
मी लद्दाखमधील बंधु – भगिनींचे त्यांनी हिल काऊसींलच्या निवडणुकीत आमच्या खासदार व त्यांच्या टिमला संपूर्ण बहुमत दिल्याबद्दल आभार मानतो. बंधु – भगिनींनो हा विकास जम्मु, काश्मिर खोरे, लद्दाख येथे आवश्यकतेनुसार प्राधान्याने विकासावर भर देऊन पुढे जाण्या संदर्भात माझी चर्चा येथील मुख्यमंत्रीच वित्तमंत्री यांच्या सोबत झाली आहे. मी पुन्हा एकदा काश्मिरच्या भूमीला वंदन करतो व तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.युवकांच्या भरवशावर एक ताकदवान काश्मिर बनवण्यासाठी पुढे चला. मी आपला खुप- खुप आभारी आहे.
D.Wankhede/B.Gokhale
At the public meeting at SherE Kashmir Stadium reiterated the message that India is incomplete without Kashmiriyat. https://t.co/jWcby9yzRj
— NarendraModi(@narendramodi) November 7, 2015
The package for J&Kannounced today will give a boost to all-round development of the state & give wings to the aspirations of the youth.
— NarendraModi(@narendramodi) November 7, 2015
Guided by Mantra of 'Sabka Saath, SabkaVikas' our Govt. is ensuring that the fruits of progress reach every person in every part of India.
— NarendraModi(@narendramodi) November 7, 2015
Development projects that will contribute to the progress of J&K& the nation. pic.twitter.com/aymQlTvAjF
— NarendraModi(@narendramodi) November 7, 2015
There is something special about J&Kthat draws me there so often. Always a delight to visit & my gratitude to the people for the warmth.
— NarendraModi(@narendramodi) November 7, 2015