पीएम्इंडिया
औद्योगिक संपदा क्षेत्रात भारत आणि सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिंगापूरचे पंतप्रधान येत्या 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार असून त्यावेळी दोन्ही देश या करारावर स्वाक्षऱ्या करतील.
पेटंट्सचे औद्योगिक संपदा हक्क, ट्रेडमार्क्स आणि औद्योगिक आरेखने या क्षेत्रात दोन्ही देशांमधले सहकार्य या करारामुळे वृध्दींगत होईल. दोन्ही देशात शोध, सर्जनशीलता आणि प्रगत तंत्रज्ञानाला यामुळे चालना मिळेल.
दोन्ही देशातल्या जनतेत, व्यावसायिकांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये बौध्दीक संपदेबाबत प्रचार या करारांतर्गत केला जाईल. तसेच अनुभवांची देवाणघेवाण केली जाईल.
N.Sapre/S. Kakade/P. Kor