Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शौर्य पुरस्कार वितरणप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

शौर्य पुरस्कार वितरणप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

शौर्य पुरस्कार वितरणप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

शौर्य पुरस्कार वितरणप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी श्रीमती मेनका जी, गिताजी आणि आज ज्या वीर बालकांना पुरस्कार मिळत आहे त्यांचे कुटुंबीय आणि सर्व उपस्थित मान्यवर मी या सर्व बालकांचे सह्रदय अभिनंदन करतो. त्यांच्या आई-वडिलांचाही गौरव करतो. मी पाहिले की बहुतेक पुरस्कार हे पाण्याशी संबंधित आहेत आणि काही विजेशी संबंधित आहेत. लवकर लक्षात येणाऱ्या याच गोष्टी असाव्यात.

घटनेपेक्षा त्यावेळी त्या बालकाच्या मनात काय विचार आला आणि त्याने काय निर्णय घेतला याला जास्त महत्त्व आहे. आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच घटना घडताना पाहतो पण त्यावेळी आपल्या लक्षात येत नाही की हे असे असू शकेल. म्हणून प्रसंगावधान आणि त्या अनुरुप कृतीचा हा परिणाम असतो की एखाद्याचे धाडस एखाद्याला नवीन आयुष्य प्रदान करते.

ही ती बालकं आहेत ज्यांनी याप्रकारच्या गोष्टी करुन दाखवल्या आहेत. व्यक्तीच्या आयुष्यात साहस हा स्वभावाचा भाग झाला पाहिजे. जर साहस स्वभाव होत नसेल केवळ एक घटना म्हणून राहत असेल, मग समाजजीवनात ज्याप्रकारच्या लोकांची आवश्यकता आहे, त्यांची कमतरता जाणवते. ज्या बालकांनी हे करुन दाखवले आहे. आपल्याला आज वाटते की, ठीक आहे, केले असेल. पण ती घटना आणि त्यावेळची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की हे कसे केले असेल. त्यावेळी त्याला तार, प्लास्टीक स्लीपर आठवले असेल, त्याला विजेचा धक्का बसला आहे, त्याला वाचवले पाहिजे. हे सर्व विचार एकाचवेळी त्याच्या मनात आले असतील. ही फार मोठी बाब आहे. नाही तर ठीक आहे कोणी पाहिले तर प्रयत्न करेल चला मी जरा वाचवतो.

साधारणपणे एखादा व्यक्ती शूर आहे म्हणून तो साहसी असतो, असे नाही. युध्दाच्या मैदानात तर पाडावही करु शकतो. पण जोपर्यंत आतमध्ये संवेदना जागृत होत नाही तोपर्यंत धाडस होत नाही. कोणासाठी काहीतरी करायचे ही भावना सहजपणे स्वभावाचा भाग बनत नाही. हे तेंव्हाच घडते जेंव्हा सर्वांप्रती आपलेपणाची भावना निर्माण होते.

आपल्या डोळ्यात काही गेले तर परिपत्रक काढावे लागत नाही की हात वर करा, डोळ्याजवळ न्या, मग डोळा बरा होईल असे परिपत्रक काढावे लागत नाही. पण जेंव्हा डोळ्यात काही जाते तेंव्हा आपोआप हात वर जातो..हा शरीराचा भाव आहे. शरीराचा एक अवयव दुसऱ्या अवयवाशी एवढ्या सहज जोडलेला असतो की सहजपणे शरीरातील दुसरा अवयव कृती करतो.

समाजजीवनातही मानवजातीप्रती, समाजाप्रती, निसर्गाप्रती जेंव्हा ही भावना होते, आपलेपणाची भावना होते, मी या सागराचा एक भाग आहे तेंव्हा कुठे काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते आणि तिचे रुपांतर धाडसामध्ये होऊन परिस्थिती बदलते. या बालकांनी जे कार्य केले आहे त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. पण माझी इच्छा आहे की, हे एक छायाचित्र, हीच एक घटना, हेच त्याच्या आयुष्याचं सर्व काही आहे, असे नाही झाले पाहिजे. अन्यथा ग्लॅमर मिळून, सर्व बाजूने प्रशंसा होते. घरी पाहुणे आले की आई-वडिल पहिली दहा मिनिटं हेच सांगतात. तो पाहुणा चारवेळा आला तरी हेच सांगतील. हे स्वाभाविकही आहे. पण कधी कधी हे विकासयात्रेसाठी अडथळा ठरते.

या बालकांच्या आयुष्यात हे पुरस्कार, हे सन्मान, या गौरवगाथा, या घटना येथेच थांबतील. त्यांचे आयुष्य थांबाव्यात अशी माझी इच्छा नाही. त्यांच्या आयुष्यात सतत नवनव्या उंचीवर पोहचतील असे केले पाहिजे. ज्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे, त्यामध्ये या बाबींचा संग्रह केला आहे की, पुरस्कार तर प्राप्त झाला मग या बालकांचे काय झाले. या पुरस्कामध्ये याचा शोध घेण्यात आला आहे. मला वाटते हा सर्वात मोठा संदेश आहे की आयुष्यात एक क्षण होता त्याक्षणी काही तरी करुन दाखवले, पण हा क्षण म्हणजे आयुष्य नाही. अशाप्रकारच्या हजारो कोटी क्षणांपासून आयुष्याची निर्मिती होते. या यात्रेचे पूर्ण सार या पुस्तकात आहे.

मला विश्वास आहे की बालक आणि त्यांचे कुटुंबीय, इतर लोक त्यांचे अशा बालकांकडे लक्ष जाईल की ज्याने बालपणी काही कार्य केले होते. पण तो सतत काही तरी करत होता. आयुष्याच्या एका कार्यकालात तो पोहचल्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहून त्याने समाजासाठी काय केले त्या सर्व बाबी या पुस्तकात आहे. मी या सर्व बालकांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.

S.Thakur/S.Tupe/M.Desai