Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकन मध्यवर्ती बँकेच्या चलन आदान-प्रदान सुविधेला मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पासून श्रीलंकन केंद्रीय बँकेला मिळणाऱ्‍या 1.1 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या विद्यमान चलन आदान-प्रदान सुविधेला 8 मार्च 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कार्योत्त्तर मान्यता दिली आहे. यापूर्वी ही मुदत 3 मार्च 2016 पर्यंत होती.

या प्रस्तावाच्या मंजुरीमूळे श्रीलंकेला पर्यायी होईपर्यंत तात्पुरता दिलासा मिळेल.

3 महिन्यांच्या अवधीत किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अर्थसहाय्य प्राप्त होईपर्यंत श्रीलंकेला 700 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची विशेष चलन आदान-प्रदान सुविधा उपलब्ध करुन देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

या प्रस्तावाच्या मंजुरीमूळे 2015 पासून खालावत असलेल्या श्रीलंकेच्या अधिकृत चलनसाठ्यास आर्थिक मजबुती मिळेल. तसेच, भारत व श्रीलंका यांच्यादरम्यान आर्थिक व द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.

D.Wankhede/S.Tupe/M.Desai