Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधानांना दूरध्वनी करुन उरी येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला


राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन जम्मू आणि काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला.

राष्ट्रपती सिरिसेना यांनी सीमेपलिकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मृतांच्या कुटुंबियांप्रति शोकभावना व्यक्त केल्या. प्रांतातील दहशतवादाचे संकट संपवण्यासाठी सर्व देशांमध्ये कायमस्वरुपी सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

B.Gokhale/S.Kane/Anagha