पीएम्इंडिया
श्रीलंकेच्या 67 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “श्रीलंकेच्या नागरिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या शुभेच्छा. इतिहास, सांस्कृतिक आणि मूल्यांचा वारसा जपणाऱ्या उभय देशांमध्ये अतूट संबंध आहेत. आगामी वर्षात श्रीलंकेत होणाऱ्या विकास कार्यांना माझ्या शुभेच्छा. राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांच्या या महिन्यानंतर होणाऱ्या दौऱ्यात, त्यांचे स्वागत करण्यास मी उत्सुक आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.