पीएम्इंडिया
मित्रांनो स्वागत,
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. देशातल्या सव्वाशे कोटी देशवासियांचे संसदेकडे, संसदेच्या कार्यवाहीकडे, रेल्वे अंदाजपत्रक आणि अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे जे स्थान आहे, त्यामुळे जगाच्या नजराही भारताच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे आहेत. गेले काही दिवस सर्व राजकीय पक्षांबरोबर सातत्यानं विचार-विनिमय सुरु आहे. केवळ औपचारिकता न ठेवता विचार-विनिमय सुरु आहे. एकेकाशी चर्चा होत आहे. संसदेच्या कामकाजाच्या वेळेचा सदुपयोग होईल, आशयघन चर्चा होईल असा मला विश्वास आहे. देशातल्या जनतेच्या आशा-आकांक्षावर गहन चिंतन होईल.
आतापर्यंत झालेल्या सर्व बैठकांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. आजपासून सुरु होत असलेल्या अधिवेशनात येत्या दिवसात त्याचे प्रत्यंतर देशवासियांना नक्कीच येईल.
सदनाचा उपयोग सखोल विचार-विनिमयासाठी झाला पाहिजे. सरकारवर भरपूर टीकाही झाली पाहिजे. सरकारमधल्या त्रुटी समोर यायला हव्यात. लोकशाही मजबूत करण्याचा, जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा हाच एक मार्ग आहे.
अनेक अनेक धन्यवाद मित्रांनो.
N. Chitale / S. Tupe / M. Desai
As the Budget Session begins, my thoughts on having a productive Session. https://t.co/i1tfY8Yu3X
— Narendra Modi (@narendramodi) February 23, 2016