Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांना दिलले निवेदन


नमस्कार मित्रहो, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने  अधिवेशनाची सुरुवात होत आहे. मुस्लीम महिलांना त्यांचा  हक्क देणारे त्रिवार तलाक  विरोधी विधेयक  संसदेच्या याआधीच्या  सत्रात संमत  व्हावे असा आमचा प्रयत्न होता आणि त्रिवार तलाक  सारख्या महत्वाच्या मुद्दयावर राजकारण  होणार नाही अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही, संसदेच्या आधीच्या सत्रात त्रिवार तलाक विरोधी विधेयक संसदेत संमत होऊ शकले नाही. देशातल्या सर्व राजकीय पक्षांनी संसद अधिवेशनाच्या या सत्रात तिहेरी तलाक, विशेषत: मुस्लीम  महिलांच्या हक्कांचे रक्षण करणारे हे विधेयक आपण सर्वांनी मंजूर करु या आणि 2018 या नववर्षाची एक उत्तम भेट मुस्लीम महिलांना सादर करु या असे पंतप्रधानांनी, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याआधी प्रसार माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्वपूर्ण असते. संपूर्ण जग, भारताच्या अर्थव्यवस्थेप्रती आशावादी आहे. भारताच्या प्रगतीबाबत, जगातल्या सर्व पत मानांकन  एजन्सी, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या सर्वच संस्था, सकारात्मक मत दर्शवत असून देशाच्या वेगाने पुढे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणारा, देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असेल असे पंतप्रधान म्हणाले. अर्थसंकल्पानंतर महिनाभर यासंदर्भात  वेगवेगळया समित्यांमध्ये  चर्चा होते. पक्षापेक्षा देश श्रेष्ठ असल्याचा अनुभव यावेळी येतो कारण सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातले सदस्य अर्थसंकल्पाची वैशिष्टये तसेच त्रुटी दर्शवतात, अशाप्रकारे निकोप  वातावरण असते.

 

या महिन्यात समित्यांमध्ये जी चर्चासत्रे असतात त्याचा उपयोग करुन अर्थसंकल्पाचा जास्तीत जास्त लाभ  देशातल्या सर्वसामान्यापर्यंत कसा पोहोचेल, दलित, पीडीत आणि शोषितांपर्यंत  कसा पोहोचेल, गरीब शेतकरी मजूर या वर्गाला कसा मिळेल यावर व्यापक चिंतन व्हावे, सकारात्मक  सूचना याव्यात आणि त्यानुसार पथदर्शी  आराखडा तयार करुन आपण वाटचाल  करावी अशी भूमिका  मी काल पक्षाच्या बैठकीत मांडली आहे.

 

अनेक अनेक धन्यवाद.

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/Anagha