पीएम्इंडिया
आदरणीय अध्यक्ष महोदया,
पर्यावरणाबाबत संपूर्ण जगभरात बऱ्याच कालावधीपासून चर्चा होत होती परंतु मागील काही वर्षांपासून सामान्यांच्या आयुष्यावर याचे परिणाम दिसून येत आहेत. विपरित परिणाम दिसून येत आहेत आणि त्याचमुळे पर्यावरण हा सगळीकडे चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे मनुष्यासमोर एक मोठे आव्हान बनून उभे ठाकले आहे की, या समस्येवर कसा मार्ग शोधवा.
नुकत्याच पॅरिसमध्ये झालेल्या सीओपी 21 परिषदेत संपूर्ण जगभरातल्या नेत्यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकल्प केला आहे. तसेच दोन महत्त्वपूर्ण उपक्रमदेखील हाती घेतले आहेत. एक उपक्रम म्हणजे नाविन्याच्या दिशेने कार्य करुन जैव इंधनापासून मुक्त होऊन ऊर्जा क्षेत्रात कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो. अमेरिका, फ्रान्स आणि भारत या तिघांनी एकत्रितपणे नाविन्याचा उपक्रम हाती घेतला आहे. बिल गेट्स संस्थादेखील यासोबत आहे. या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येतील.
दुसरा महत्त्वपूर्ण निर्णय या परिषदेत झाला तो म्हणजे जगभरात अंदाजे असे 122 देश आहेत जिथे 300 दिवस संपूर्ण सूर्यप्रकाश असतो म्हणजेच या देशांना 300 दिवस सूर्यप्रकाशाचा फायदा मिळतो. भारताच्या पुढाकाराने अशा देशांची एक संघटना तयार झाली आहे ज्याचे मुख्यालय भारतात असेल. भविष्यात सौर ऊर्जेचा वापर कशाप्रकारे केला जावा यासंबंधात हे सर्व देश एकत्रितपणे कार्य करतील.
मेक इन इंडिया हा जो उपक्रम आहे त्यामध्ये आज ही एक नवीन भेट… हे संपूर्ण जगभरासाठी उपयोगी ठरणार आहे कारण बॅटरीची नवीन प्रकारे कशी रचना केली जावी, बॅटरी जास्तीत जास्त वापरली जावी तसेच बॅटरी स्वस्त दरात उपलब्ध व्हावी यावर संशोधन झाले आहे आणि त्याचेच फलित म्हणजे जुन्या बसमध्ये थोडासा खर्च करुन आताच आपण पाहिलंत की बस काहीही आवाज न करता चालत होती. आणि यापासून प्रदूषण होण्याचा काही प्रश्नच नाही.
सध्या तरी याचा फायदा आपल्या संसद सदस्यांनाच होणार आहे. परंतु, स्टार्ट अप इंडिया स्टॅण्ड अप इंडिया या उपक्रमात जर अशा प्रकारच्या बॅटरी बनवण्यासाठी नवीन पिढी पुढे आली तर जलद गतीने आपण आपल्या सार्वजनिक वाहतूक प्रणालीमध्ये या नवीन रचनेचा उपयोग करु शकू.
आमच्या नितीनजींना या विषयात आवड आहे. ते या संदर्भात नेहमीच काहीना काही वाचत असतात आणि नवनवीन शोध घेत असतात. त्यांनी मेक इन इंडिया उपक्रमाला बळकटी प्रदान करतानांच पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचा हा जो यशस्वी प्रयत्न केला आहे त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तसेच संसदेच्या नेहमीच्या कार्याव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नांना आदरणीय सुमित्राजींनी जे प्रोत्साहन दिले आहे त्याबद्दल देखील मी सुमित्राजींचे अभिनंदन करतो.
धन्यवाद.
S.Mhatre/S.Tupe/M.Desai
In Paris during #COP21, leaders of the world came together & focus was placed on innovation (in energy): PM @narendramodi @India4Climate
— PMO India (@PMOIndia) December 21, 2015
Another initiative, where India played a key role, is solar alliance. It consists of nations blessed with lot of sunlight: PM @India4Climate
— PMO India (@PMOIndia) December 21, 2015
This bus here (launched today), it is not making noise and scope of pollution also does not arise: PM @narendramodi https://t.co/ztQyG5hBNU
— PMO India (@PMOIndia) December 21, 2015
The Retrofit Electric Bus launched in Parliament today is a part of our larger efforts to create clean public transport & minimise pollution
— Narendra Modi (@narendramodi) December 21, 2015
Retrofitted Electric Bus is cost effective & is at the core of @makeinindia initiative- @isro is making Lithium–Ion batteries.
— Narendra Modi (@narendramodi) December 21, 2015
Highlighted why clean energy matters & key outcomes of #COP21 to mitigate #ClimateChange. @COP21 @India4Climate https://t.co/cOS5SqWNNR
— Narendra Modi (@narendramodi) December 21, 2015