Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सचिवांच्या पहिल्या गटातर्फे कल्पना आणि सूचनांचे पंतप्रधानांसमोर सादरीकरण

सचिवांच्या पहिल्या गटातर्फे कल्पना आणि सूचनांचे पंतप्रधानांसमोर सादरीकरण


प्रशासनाच्या विविध क्षेत्रात परिवर्तनीय बदल घडवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सूचवण्याच्या पंतप्रधानांच्या सूचनेला प्रतिसाद देत सचिवांच्या (आठपैकी) पहिल्या गटाने, ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षमतेबाबतच्या आपल्या कल्पना आणि सूचना पंतप्रधानांसमोर सादर केल्या.

यावेळी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री श्री राजनाथ सिंग, श्री अरुण जेटली, श्रीमती सुषमा स्वराज, निती आयोगाचे उपाध्यक्ष श्री अरविंद पनगडिया तसेच केंद्र सरकारचे सर्व सचिव उपस्थित होते. सादरीकरणादरम्यान आणि त्यानंतरही पंतप्रधानांसह श्रोत्यांमधील अनेक सदस्यांनी सादरीकरणाच्या संकल्पनेबाबत प्रश्न विचारले आणि आपल्या सूचना नोंदवल्या.

पंतप्रधानांनी या सादरीकरणाचे कौतुक केले आणि सचिवांनी त्यांच्यावर सोपविलेली कामगिरी अपेक्षेनुसार पूर्ण केल्याचे सांगितले. त्यांनी सर्व उपस्थितांचे सल्ले आणि सूचनांचेही कौतुक केले तसेच दिवसाच्या सादरीकरणात सहभागी असणाऱ्यांनाही शुभेच्छा दिल्या.

M. Pange/S.Tupe/M.Desai