Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

“सत्यभामासॅट” उपग्रह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चमूने पंतप्रधानांची भेट घेतली

“सत्यभामासॅट” उपग्रह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चमूने पंतप्रधानांची भेट घेतली


“सत्यभामासॅट” उपग्रह करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चमूने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यांच्यासोबत सत्यभामा विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. बी. शीला राणी यादेखील होत्या.

हरितगृह वायूंवरील माहितीचे संकलन करण्यासाठी हा उपग्रह तयार करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

इस्रोने 22 जून रोजी पीएसएलव्ही-सी 34 प्रक्षेपकाद्वारे अंतराळात सोडलेल्या 20 उपग्रहांमध्ये “सत्यभामासॅट” उपग्रहाचा समावेश होता.

S.Kane/N.Sapre