पीएम्इंडिया
उपस्थित सर्व महोदय, आज माझ्या ऊर्जेची फार चर्चा करण्यात आली. पण आज माझा गळा खराब आहे. आणि खराब यामुळे आहे कारण सकाळपासूनच फार भाषणं केली आहेत. याचा थोडातरी प्रभाव राहणारच. उद्या ठीक होईल. अरुणजी एकदा मला भेटायला आले होते. स्वच्छतेविषयी आमची बराचवेळ चर्चा झाली. त्यावेळी मी काही गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या. मला आश्चर्य वाटते की त्यांनी प्रत्येक मुद्दा उचलून त्याचा पाठपुरावा केला आणि लोकांनाही प्रेरित केले, लोकांना जोडले. त्यांच्या या प्रयत्नांसाठी मी त्यांचे सहृदय अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचे धन्यवाद मानतो.
ज्यांना आज पुरस्कार मिळाला आहे, त्यांना सन्मानित करण्याचे भाग्य मला मिळाले. मला खात्री आहे, तुम्ही जे काम केले आहे ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि हे काम असेच अव्याहत सुरू राहिल. तुम्ही केलेल्या साध्यप्राप्तीमुळे अनेकांना काम करण्याची प्रेरणा मिळेल यासाठीही मी तुमचे अभिनंदन करतो. त्याचवेळी मी आपल्याकडून अपेक्षा करतो की, तुम्हाला जेव्हा केव्हा या विषयावर लोकांशी संवाद साधायची संधी मिळेल, या कार्याविषयी सांगा, तुमचे अनुभव सांगा. तुम्ही कशाप्रकारे हे काम केले, त्याची अंमलबजावणी तुम्ही कशी केली, कसे निकाल मिळाले, कारण हेच प्रेरणेसाठी सर्वात मोठे कारण ठरणार आहे. आज सर्व कलाकार मित्रांनी कार्यक्रमात रंग भरले. माझ्याकडे फारसा वेळ नसल्यामुळे मला त्याचा आस्वाद घेता आला नाही, परंतु हे तुमचे योगदान आहे. देशाच्या युवा पिढीला या कामासाठी हे प्रेरित करेल. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो की तुम्ही या कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
मी पाहत आहे, हा एक असा कार्यक्रम आहे, स्वच्छ भारत, यात जवळपास प्रत्येकजण मदत करत आहे. प्रसारमाध्यमांनी विशेषतः इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी एक मोहीम चालवली आणि या मोहिमेत सरकारविरोधी काहीच नव्हते. ते लोकांना दाखवत होते, ज्या ठिकाणी कचराकुंडी आहे, तरीही लोक बाहेर कचरा फेकत आहेत, कॅमेऱ्यात हे टिपून त्या व्यक्तीला दाखवले जात होते, मग त्या व्यक्तीला लाज वाटत होती. इतरांनाही वाटत होते, कचराकुंडी तर आहे, मग आपण त्यात का कचरा टाकत नाही. स्वच्छता हा मुळातच प्रत्येकाचा स्वभाव आहे. जर, एकवेळ तुमचा स्वभाव बनला तर तुम्ही अस्वच्छता कधीच सहन करणार नाही. दुर्दैवाने आपल्या देशात आमची काही वैशिष्ट्ये आहेत. आमच्या समाजात वैयक्तिक स्वच्छतेविषयी मोठी जागरुकता आहे. पण, सामाजिक स्वच्छतेप्रती उदासिनता आहे. तुम्ही पाहिले असेल, की घरातील जुनी जाणती माणसे बाहेरुन आल्यानंतर पाय धुवायला सांगतील, बुटं बाहेर काढायला सांगतील, मग घरात यायला सांगतील. त्यांच्या मनात काही धार्मिक कारणं असतीलही, परंतु, मुळात या परंपरा आहेत. हात धुवा, अमके करु नका, तमके करु नका, ही छोटी गोष्ट आहे. ज्या परिवारात मागील पिढीतील लोक आहेत, त्यांच्या हे लक्षात येईल. शहर असेल, गाव असेल, वैयक्तिक स्वच्छतेप्रती आमचा समाज जागरुक आहे. पण, सामाजिक स्वच्छतेबाबतीत मात्र उदासिनता आहे. आता आवश्यकता आहे ती, आम्ही वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामाजिक स्वच्छतेलाही तेवढेच महत्व देण्याची. जर आम्ही हे करु शकलो नाही तर. दुसरे म्हणजे…देशाच्या स्वातंत्र्यानंतर आमच्याकडे एक उणीव राहिली. ती म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात एक वातावरण निर्माण झाले होते, सोबतच डोक्यात एक विचार घट्ट होता तो म्हणजे आता आम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. देश स्वतंत्र झाला. सर्व काही सरकार करेल. आमच्या लक्षात एक गोष्ट आली ती म्हणजे, जर गावात एक छोट्टा खड्डा असेल, त्याच्यासाठी गावातील नेतेमंडळी भाड्याने जीप करुन जिल्हा मुख्यालय, राज्याच्या राजधानीला जातील. तिथे निवेदन देतील की, आमच्या गावात खड्डा आहे. पण, हाच गाडीच्या भाड्यासाठीचा पैसा तिथेच वापरला तर खड्डा भरुन निघेल.
1960 उजाडेपर्यंत देशातील नागरिकांनी देशाची उभारणी केली असती, पण झाले उलटेच, हे काम तो करेल, ते त्याचे काम आहे, तुम्ही का करत नाही,…आता स्वच्छ भारत अभियानाची गुरुकिल्ली काय आहे. ज्या दिवशी लोकांना वाटेल की हा सरकारी कार्यक्रम आहे, मग ते कधीच सफल होणार नाही. आणि ज्यादिवशी लोकांना वाटेल की, हा मोदीचा कार्यक्रम आहे, मग तर एकदमच निष्फळ होईल.
जर हा कार्यक्रम राजकीय पक्षांचा झाला, सरकारी कार्यक्रम झाला, तर मला वाटते आपण याचे एवढे नुकसान करू की आपण कल्पनाही करु शकत नाही. हा आपला सर्वांचा कार्यक्रम झाला पाहिजे. पंतप्रधानाला कुठेच कचरा फेकण्याचा हक्क नाही. तसेच कोणत्याही नागरिकालाही हा हक्क नाही. जोपर्यंत हा विचार रुजत नाही, तोपर्यंत आपण देशाला या अवस्थेत पोहचवू शकत नाही. मला माहित आहे, हा जो विषय मी लाल किल्ल्यावरुन सर्वांसमोर ठेवला होता. मी काही विचार करुन किंवा कागदावर कार्यक्रम ठरवून गेलो नव्हतो आणि ते मला जमतही नाही, ती माझी सवय नाही. माझ्या मनात आले ते मी बोलून दाखवले. त्याच वेळी मला याचा अंदाज आला की, एकीकडे माझे भाषण चालू होते, आणि दुसरीकडे विचारप्रक्रीया सुरू होती की, मी फार मोठी जोखीम घेतली आहे. माझे केस ओढले जातील. पण ही जोखीम मी घेतली. मला वाटते या विषयावर गांधींजींपेक्षा कोणती मोठी प्रेरणा असू शकत नाही. गांधीजींची 150 वी जयंती 2019 मध्ये आहे. काय आम्ही गांधीजींची इच्छा पूर्ण करु शकणार नाही? गांधींनी आम्हाला काय दिले नाही? आज आम्ही जे काही आहोत, त्या महापुरुषामुळेच आहोत. काय आम्ही प्रयत्न करु शकत नाही? माझ्या प्रेरणेमागे हाच एक विचार होता आणि त्यातूनच हा कार्यक्रम सुरू झाला. तो कार्यक्रम आता सुरू आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, माझे काही चुकले तर मला माफ करा, जे लोक माझे अत्यंत सुक्ष्मरित्या विश्लेषण करतात, ते लोक..पण माझ्या मते देशाच्या स्वातंत्र्यानंतर संसदेत कधीच स्वच्छतेवर चर्चा झाली नसेल. पण माझे असे मत आहे, गेल्या एक वर्षात एकही अधिवेशन असे नसेल ज्यात स्वच्छतेवर चर्चा झाली नाही. आम्हाला बोलणीही खावी लागली. कोणी कल्पनाही केली नसेल, ही प्रसारमाध्यमे, यात व्यवसाय तर आहेच. फक्त ब्रेकिंग न्यूज नाही, तर जाहिरातींविनाही त्यांनी हा कार्यक्रम चालवला. कधी विचार केला होता का, स्वच्छतेसाठी एवढे कलाकार, एवढे लोक..आज दिवसभर एकच मंत्र होता सफाई, सफाई, सफाई. हे यापूर्वी कधी झाले नसेल. जर याच्या यशाचे मोठे परिमाण असेल तर हे आहे. मला जे लोक भेटतात, त्यात मला एक बाब निश्चित ऐकायला मिळते, ती म्हणजे, मोदीजी तुम्ही आमचे जगणे अवघड केले आहे. मी विचारले का, काय झाले, तो म्हणाला, मला पानमसाला खाण्याची सवय होती, पण माझा नातू कुठे थुंकू देत नाही. तो मोदी मोदी करत असतो. आता या क्षेत्रातील लोकांना माहिती आहे की, असे नाही की मोदीने येऊन स्वच्छता हा विषय सुरू केला आहे. काही असे व्यक्ती आहेत, ज्यांनी याकामी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. कुठे गांधी विचारांचे लोक आहेत, त्यांनी आपली हयात घालवली, त्या सर्वांना बरोबर समजते की, याचा किती फायदा होणार आहे.
तुम्ही पाहिले असेल, आपल्या देशात बोअरवेलमध्ये जर एखादा मुलगा अडकला असेल, सध्या तर टीव्हीवाले त्यासाठी वेळ देत नाहीत पण पूर्वी सर्व टीव्ही कॅमेरे त्याठिकाणी असत. आता तो श्वास घेत आहे, डोळ्यांची हालचाल होत आहे. थोड्याचवेळात सैन्याचे जवान पोहचणार आहेत, नेतेमंडळी आली आहेत. पण लोकांचा नेतेमंडळींवर राग आहे. हे सर्व आपल्या जागी होणार. 24 तास किंवा ते काढायला जितका वेळ लागत असेल तेवढा वेळ यांची कॉमेंट्री सुरू राहणार. आणि मी पाहिले होते की, घराघरातून महिला टीव्हीसमोर बसून राहत असत. स्वयंपाक करत नसत, आणि मुल जिवंत निघाले की नाही असे विचारून रडत असत, हे दृश्य तुम्हाला आठवत असेल. एक मूल बोअरवेलमध्ये मरणाच्या वाटेवर आहे, ही भावनाच देशाला अस्वस्थ करत होती. पण आम्हाला माहित आहे का, घाणीमुळे, घाण पाण्यामुळे, घाणीत राहिल्यामुळे प्रतिदिन एक हजार मुलांचा मृत्यू होतो. आता तुम्ही सांगा, ही परिस्थिती किती दिवस आम्ही चालू देणार. एका गरीब कुटुंबाला घाणीमुळे झालेल्या आजारांसाठी सरासरी सात हजार रुपयांचा खर्च येतो. जर, त्याच्या आयुष्यात सात हजार रुपयांची बचत होईल, म्हणजे महिन्याकाठी सरासरी 500 रुपयांची बचत होईल.
जर आपण सर्वांनी याविषयाकडे या नजरेतून पाहिले तर, आपल्याला दुर्गंधी पसरवण्याचा काहीच अधिकार नाही. ही आमची जबाबदारी आहे आणि हे काम हे सरकार, ती नगरपालिका करत नाही. या वादांपासून देशात खरेच गांधींचे स्मरण करुन काम करायचे आहे, तर मी सर्वांना एकच विनंती करेन, सुरुवातीला ज्यांना टीका करायची होती, त्यांनी केली. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छितात तर सहभागी व्हा पण हा चेष्टेचा विषय बनवू नका. मला आठवते, काशीत तुम्ही अस्सी घाटला पुरस्कार दिला. तिथे एक प्रभू घाट आहे. एक नागालँडची मुलगी जी काशीमध्ये शिक्षण घेत होती. तिचे तिथे मन रमले आणि ती प्रभू घाटच्या स्वच्छतेसाठी कामाला लागली. हळूहळू तरुण पिढीची तिला साथ मिळाली. तुम्ही जाऊन पाहा प्रभू घाट.. वा..काय स्वच्छता केली आहे, या मुलांनी. सर्व तरुण पिढीतील आहेत. बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थी आहेत. ते साफसफाई करतात. पण माहिती नाही, काही लोकांना यातही चेष्टा-मस्करी सुचते. सकाळी जाऊन त्याठिकाणी कचरा फेकून यायचे, आणि हे रडायचे की, एवढी मेहनत करुनही पुन्हा घाण झालीच. पुन्हा ते सफाईच्या कामी लागायचे. किती कटीबद्धता असेल. मी त्या सर्व तरुणांना भेटलो, ते सर्व माझ्यासाठी प्रेरणादायी होते कारण कशाप्रकारे परिवर्तन घडून येत आहे. आता बंगळूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी एक ॲप तयार केले आहे, अमेरिकेतील एका स्पर्धेसाठी त्यांना निमंत्रित केले होते त्यात ते बक्षीस जिंकून आले आहेत. ॲप काय आहे- तुमचा कचरा जमा करणारा आणि कचरा देणारा दोघांसाठी त्यात जागा आहे. या ॲपने एक बाजारपेठ उभारली आहे. हे सर्व बंगळूरच्या एका शाळेतील आठवी, नववी, दहावीचे विद्यार्थी आहेत. अमेरिकेत बक्षीस जिंकून ते नुकतेच परत आले आहेत.
म्हणजे एवढ्या प्रकारचे लोक या कामी लागले आहेत. मला काल कोणीतरी सांगितले, आमच्या व्यैंकय्याजींनी सांगितले, की अहमदाबादमध्ये 102 वर्षाची वयोवृद्ध महिला राहते. ती सकाळी उठून गल्लीत एक फेरी मारते. गल्लीत कचराकुंडी आहे की नाही हिच या महिलेची मोहीम आहे. कचराकुंडीत कचरा टाका, बाहेर टाकू नका. वय वर्ष 102. आज किती बदल झाला आहे पाहा. एखादी मुलगी म्हणते की घरात शौचालय नसेल तर मी लग्न करणार नाही. या घटना घडत आहेत. एक महिला शौचालयासाठी आपली शेळी विकते. परिवर्तन होत आहे. याचे रुपांतर लोकचळवळीत होत आहे, त्याचे परिणाम दिसून येत आहेत. आजही उघड्यावर शौचास जाणाऱ्या व्यक्तींची संख्या जगभर 60 कोटी आहे, जागतिक बँकेची ही नोंद आहे. 60 कोटी लोक उघड्यावर शौचास जातात. सर्व रोगांचे मूळ तिथूनच सुरू होते. शौचालयनिर्मितीची चळवळ सुरू झाली आहे. जेंव्हा हा विषय मी सरकारी पातळीवर आणला तेंव्हा..कारण हा काही सरकारचा विषय नव्हता. बजेट-बजेट सुरू असायचे. मी क्षमता निर्मितीचे काम केले. 200 जिल्हाधिकाऱ्यांचे आतापर्यंत प्रशिक्षण झाले आहे. देशात 600 पेक्षाही जास्त जिल्हे आहेत. सर्वांना बोलावतो व सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण करतो. कारण क्षमता मोठी आवश्यकता आहे. महत प्रयत्नानंतर 60 लाख शौचालयनिर्मितीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. काल जेंव्हा मी यासंबंधी अहवाल मागवत होतो, उद्या 2 ऑक्टोबर आहे, काम कुठपर्यंत आले आहे. मला सांगण्यात आले की, 95 लाख शौचालये बांधून झाली आहेत. 60 लाखांचे लक्ष्य निर्धारित करताना घाबरत होते, हे परिवर्तन घडून आले आहे. शाळांमध्ये सुमारे चार लाख 15 हजार शौचालये मुलींसाठी एका निर्धारित वेळेत बांधण्यात आली. रेल्वेने सुमारे 5700 शौचालयांचे परिवर्तन बायो-टायोलेटमध्ये केले. कारण रेल्वे आल्यानंतर सर्व घाण रेल्वेरुळांवर टाकून पुढे निघून जात असे.
आता हे सर्व सुरू होते..कोण, कुठे, हळूहळू यात….आता एक गोष्ट आहे..कोणीपण म्हणू शकते की, हे काय झाले? हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. सरकारलाही उत्तर द्यावे लागणार आहे, यापासून सुटका नाही. याठिकाणी मी चार गोष्टींचा उल्लेख करु इच्छितो. एक म्हणजे सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दक्षिण कोरिया हे छोटे छोटे देश आहेत. आमच्या राज्यापेक्षाही छोटे. सिंगापूरमध्ये 1959 मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी स्वच्छतेविषयी सुरुवात केली होती. तेंव्हा सिंगापूर हे छोटे मच्छीमारांचे गाव असल्यासारखे होते. पण, 1968 पर्यंत हे शक्य झाले नाही. पंतप्रधान सतत याविषयी प्रयत्न करतच होते. 1968 मध्ये तेच पंतप्रधान ली कुआन यीव स्वतः या कामाचा वीडा उचलून पुढे निघाले. 1959 पासून म्हणजे सुमारे 1960 पासून आजपर्यंतचा तुम्ही जो सिंगापूर पाहत आहात, तो एका पुरुषार्थाचा परिणाम आहे. त्याच प्रकारे मलेशियाच्या पंतप्रधानांनीही 60 मध्ये हा विषय मांडला होता आणि त्यांनी नागरिकांना कायद्याची सक्तीही केली होती. आमच्याकडे तर फार कठीण आहे. त्यांच्याकडे तीही ताकद होती त्यांनी 1960 मध्ये सुरु केले होते. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली हे काम चालले. लोकसहभागाचे भरपूर प्रयत्न करण्यात आले. आज मलेशिया एवढ्या वर्षानंतर या स्थितीत पोहचलाय. थायलंड चे राजा स्वतः स्वच्छता मोहिमेत उतरले. त्यांनी झाडू उचलला, आणि निघाले. हे ही 1960 मध्येच सुरू झाले. या चौघांनी एकाचवेळी आपल्या कामाला सुरुवात केली. आज आपण त्यांची स्वच्छता आणि साफसफाई पाहत आहोत, त्यासाठी 2015 उजाडले.
आमचा देश किती मोठा आहे, याचा आम्हाला अंदाज आहे. आमच्या सवयी कशा आहे, याचा आम्हाला अंदाज आहे. आमच्या समस्या काय आहेत, आम्हाला माहित आहेत. पण, गांधी एक अशी प्रेरणा आहेत की, सव्वाशे कोटी लोकांनी जर ठरवले की, आम्हाला चालायचे आम्ही चालू शकतो. या एका विषयावर देशात राजकारण झाले नाही तर तुम्ही पाहाल परिवर्तन घडण्यास सुरूवात होईल. प्रत्येकाला वाटेल. गावात एवढे पैसे येतात-जातात तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही. जर त्यांनी ठरवले तर ते हे काम पूर्ण करु शकतात. शहरांसाठी, गावांसाठी आणि बहुतेक करुन आमच्या सवयीच आमची मोठी समस्या आहे. आमचा स्वभाव, चलता है, करता है. आणि जर का एकदा आम्ही वातावरणनिर्मिती केली, जी आजकाल दिसून येते. मला बरेच लोक सांगतात की, कारमधून जर कोणी पाण्याची बाटली टाकली तर दुसरा धावत येतो, कार थांबवतो आणि म्हणतो बाटली उचला, असे का केलेत तुम्ही, असे वातावरण तयार होत आहे. आणि मला सर्वात जास्त शक्ती मिळाली आहे ती म्हणजे युवा पिढीपासून मिळाली, बालकांपासून मिळाली आहे. त्यांना हा विषय बरोबर समजला आहे. आम्ही हा विषय असाच लावून धरला तर मला खात्री आहे, आम्ही मोठे परिवर्तन घडवून आणू शकू.
टाकाऊपासून संपत्ती एक मोठा व्यवसाय बनला आहे. फार कमी जणांनी विचार केला असेल की, हाही व्यवसाय बनू शकतो. मोठे सामर्थ्य असलेला हा व्यवसाय आहे, मोठ्या संख्येने लोक यात येत आहेत. साफसफाईसाठी आज वेगळी माणसं उपलब्ध आहेत. तंत्रज्ञान उपलब्ध आहे. टाकाऊपासून संपत्ती हे स्वच्छतेत होणार आहे आणि यामुळे परिवर्तन घडून येणार आहे आणि याचा लाभही होणार आहे.
कधी कधी मी छोट्या-छोट्या गोष्टी सांगतो- जसे मी काही महिला स्वयंसेवी गटांना भेटलो. त्यांना मी सहजच एक गोष्ट सुचवली होती. ती नंतर त्यांनी सुरू केली. आम्ही त्यांना सांगितले की, मंदिरातील जो काही कचरा आहे तो तुम्ही उचला. जास्तीत जास्त फूलं असतात, अगरबत्ती असतात. यातून आम्ही त्यांना अगरबत्ती बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. नैसर्गिकरित्या सुगंध मिळाला, त्यांची गाडी तर सुरू झाली. अगरबत्ती विकल्याही जातात आणि मंदिराची सफाईही होते. कमावणाऱ्यांसाठी कमाईही होऊ लागली. मी लोकांना सांगितले आहे की, छोटी-छोटी गावं आहेत, त्याठिकाणी दोन किलोमीटर-तीन किलोमीटर परिसरात छोटे-छोटे खड्डे खणून त्यात गांडूळ पैदास करता येईल आणि शहरातील कचराही याठिकाणी जमा करता येईल. गांडूळ हे फार मोठे सफाई कर्मचारी आहेत. ते कचऱ्याला खतामध्ये परिवर्तित करतात आणि ते खत विकून तुमची कमाईसुद्धा होईल. छोट्या शहराच्या शेजारी जर गांडूळाचा उपयोग केला तर मोठ्या प्रमाणात सुख मिळेल. प्रत्येक गोष्टीसाठी फार मोठ्या गोष्टींची आवश्यकता असते असे नाही. सामान्य वस्तूंमधूनही परिवर्तन घडून येऊ शकते. आम्ही जर अशाप्रकारच्या परिवर्तनावर जोर दिला तर आम्ही परिस्थितीत बदल घडवून आणू शकतो.
आमच्या देशात पुनर्चक्रण (रिसायकल) ही पाश्चात्य संकल्पना नाही. आपल्या देशाच्या मूळ स्वभावात ही संकल्पना होती. फेकून देणे (थ्रो अवे) कधीच आमच्या संस्कृतीचा भाग नव्हता. पुनर्वापर, पुनर्चक्रण करा. पूर्वी तुम्ही पाहिले असेल, कपडे जुने झाले असतील तर ते छोटे करुन लहान्यासाठी कामी येईल. तेही झाले तर पांघरण्यासाठी काही तयार करता येईल. तेही झाले असेल तर सफाईसाठी वापरता येईल. त्याचे तुकडे-तुकडे होईपर्यंत आपण वापरतो. जोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही, तोपर्यंत आपण पूर्णपणे वापर करतो. ही आमची परंपरा आहे. फेकून देणे हे आमच्या स्वभावातच नव्हते. तुम्ही पाहिले असेल की, जुन्या घरांमध्ये एक अडगळीची खोली असायची. जुन्या घराचे वास्तुशिल्प जरा तुम्ही पाहा. त्या अडगळीच्या खोलीत घरातील वृद्ध माता काहीही असेल तर त्या खोलीत टाकायला सांगत असे. कोणी म्हणत असेल की हे काहीच कामाचे नाही, तर ती म्हणत असे, बाळ हे राहू दे, कधीतरी कामाला येईल. ती प्रत्येक गोष्ट त्या खोलीत टाकत असे आणि दीपावलीच्या वेळी सफाई होत असे. त्यावेळी त्यातील दोन-चार वस्तू, पाहा या घरासाठी उपयुक्त आहे, या वापरता येतील. आजची समस्या काय आहे, नवीन घ्या. यामुळे जी समस्या निर्माण झाली आहे ते सुध्दा एक मोठे कारण आहे. आम्ही या सवयी कशा बदलू. आणि हे काही उपदेशाचे विषय नाहीत. आम्ही सर्व याचा अनुभव घेतो. यातून आपण काही मार्ग काढू शकतो.
मला वाटते की, जेवणाची वेळ आहे, तुमचा अधिक वेळ घेऊ नये. जर तुमच्या जेवणासाठी उशीर झाला असेल तर मी क्षमा मागून माझे भाषण संपवतो. मी पुन्हा एकदा या प्रयत्नांसाठी तुमचे अभिनंदन करतो आणि मी देशवासियांना विनंती करतो की, हा देश घाण करण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. काही लोक तर असे असतात की, जोरजोराने भारत माता की जय अशा घोषणा देतील आणि तिथेच थुंकतील. आता ही कुठे भारत माता…आता यातून आपल्याला देशाला बाहेर काढायचे आहे.
खूप-खूप धन्यवाद.
S. Thakur/S.Tupe
Shall join #Safaigiri Awards. Will spend time with those who made inspiring efforts for a Swachh Bharat. #MyCleanIndia @IndiaToday
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2015
Once @aroonpurie & me were talking & we spoke about cleanliness. Whatever suggestions I gave were implemented in letter & spirit: PM
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
Congratulate all award winners. Their work will inspire so many: PM at #Safaigiri @IndiaToday http://t.co/Iy8hu3Nre5 #MyCleanIndia
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
SwachhBharat is one programme where many people have helped particularly media & that too electronic media: PM at #Safaigiri @IndiaToday
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
Swachhatais a matter of Swabhav. Once its a part of your nature you will never make your surroundings dirty: PM at #Safaigiri @IndiaToday
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
We gave importance to personal hygiene but when it came to social hygiene we did not give the same importance: PM @narendramodi #Safaigiri
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
If you feel SwachhBharat Abhiyaanis a government programme it wont succeed. This has to be our programme: PM at #Safaigiri @IndiaToday
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
Who can be a bigger inspiration than Mahatma Gandhi: PM @narendramodi at #Safaigiri http://t.co/Iy8hu3Nre5 @IndiaToday #MyCleanIndia
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
Now cleanliness is being discussed in Parliament. We have even been cornered on it but the fact is discussions are happening: PM #Safaigiri
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
We do not have the right to make our nation dirty: PM @narendramodi at #Safaigiri @IndiaToday
— PMO India (@PMOIndia) October 2, 2015
#Safaigiri Awards function was an enjoyable programme with a serious message & unequivocal support to Swachh Bharat Abhiyaan. #MyCleanIndia
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2015
I congratulate @aroonpurie, @IndiaToday for their passion & support towards SwachhBharat Mission. #MyCleanIndia
— NarendraModi(@narendramodi) October 2, 2015
Spoke on social hygiene, making cleanliness a habit & positive role of media on issue of cleanliness. #MyCleanIndia http://t.co/CLoKdtZnRo
— NarendraModi(@narendramodi) October 2, 2015
What amazes me is the way people from all walks of life have made SwachhBharat Abhiyaantheir own & are contributing towards #MyCleanIndia.
— NarendraModi(@narendramodi) October 2, 2015