Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सरकार प्रमुख म्हणून देशसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांदर वुचिच यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता


नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांदर वुचिच यांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले. भारत-सर्बिया भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी सर्बियाच्या राष्ट्रपतींच्या वैयक्तिक योगदानाचे आपणास मनापासून कौतुक वाटते, असे मोदी यांनी नमूद केले.

मोदी यांनी समाज माध्यम X वरील संदेशात म्हटले आहे,

आपल्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि मैत्रीबद्दल धन्यवाद.

भारत-सर्बिया भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपण दिलेल्या वैयक्तिक योगदानाचे मला मनापासून कौतुक आहे.

आपल्या नेतृत्वाखाली सर्बियामध्ये असाधारण परिवर्तन घडून आले आहे. आपण निर्धार आणि समर्पणाने सर्बियाची सेवा केली आहे.

भारत-सर्बिया भागीदारीला अधिक उंचीवर नेण्यासाठी मी उत्सुक आहे.

@avucic

नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai