पीएम्इंडिया
रीट याचिका 2002 च्या क्रमांक 668 सह नद्यांच्या आंतरजोडणीसंदर्भातील रीट याचिका (नागरी) 2002 च्या 512 क्रमांकाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 27.2.2012 रोजीच्या निर्णयाचे अनुपालन करीत, स्थिती-सह- प्रगती अहवाल आणि नद्यांच्या आंतरजोडणीसाठी विशेष समिती स्थापन करण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीमुळे भारत सरकारच्या राष्ट्रीय भावी योजना 1980 अंतर्गत नद्या जोडणी प्रकल्पांच्या देखरेखीत मदत मिळणार आहे. नद्या जोडणीसाठीच्या विशेष समितीचा स्थिती-सह- प्रगती अहवाल द्विवार्षिक पद्धतीने मंत्रिमंडळासमोर सूचनांसाठी सादर केला जाईल. त्यामुळे देशहिताचे निर्णय जलदगत्या आणि योग्य प्रकारे घेणे सुलभ होईल.
N.Sapre/M.Pange/P.Malandkar