Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सर्वोत्तम पत्रकारितेसाठीच्या रामनाथ गोएंका पुरस्कारांचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण

सर्वोत्तम पत्रकारितेसाठीच्या रामनाथ गोएंका पुरस्कारांचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण


सर्वोत्कृष्ट पत्रकारितेसाठीचे रामनाथ गोएंका पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आले.

स्वातंत्र्य लढयाच्या काळात वृत्तपत्रे ही व्यक्त होण्याचे सामर्थ्यशाली माध्यम बनले होते असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

वर्तमानपत्राच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या, वृत्तपत्रात लिहिणाऱ्या व्यक्तींचा वसाहतवादी राज्यकर्त्यांनाही धाक वाटत असे असं पंतप्रधान म्हणाले.

दिवंगत रामनाथ गोएंका यांची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की आणीबाणीला माध्यमातल्या अगदी मोजक्यानी आव्हान दिले आणि रामनाथजीं त्यात आघाडीवर होते.

तंत्रज्ञानाने माध्यमांसमोर आव्हान निर्माण केले आहे याआधी 24 तासात प्रसारित होणारी बातमी आता केवळ 24 सेकंदात होते असे पंतप्रधान म्हणाले.

N.Sapre/S.Kane/Anagha