पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम भारत (सीईआरटी) आणि सीईआरटी-यू.के. यांच्या दरम्यान सायबर सुरक्षाविषयक झालेल्या कराराची माहिती देण्यात आली. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान 20 मे 2016 रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.
या करारामुळे सायबर सुरक्षेविषयी त्याचबरोबर सायबर गुन्हयांना आळा घालण्यासाठी, उपाय योजण्यासाठी उभय देश आपल्याकडील माहिती, ज्ञानाची देवाण-घेवाण करु शकणार आहेत.
नोव्हेंबर 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सायबर हल्ले, सायबर गुन्हे त्यापासून करावयाची सुरक्षात्मक उपाय योजना याविषयीच्या तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण उभय राष्ट्रांमध्ये करण्याबाबत चर्चा केली होती. सीईआरटी-भारताने यापूर्वी आणखी सात देशांशी सायबर सुरक्षाविषयक सामंजस्य करार केले आहेत. त्यामध्ये कोटिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सिंगापूर, जपान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही सायबर सुरक्षेविषयी शांघाय सहकार्य संघटनेशी करार केला आहे
NS/SB/AK