पीएम्इंडिया
नागपूर विमानतळासाठी एका नवीन पर्वाचा प्रारंभ :
एमआयएलला भाडेपट्ट्यावर दिलेल्या एएआयच्या जमिनीचा भाडेपट्टा कालावधी 06.08.2039 नंतरही वाढवल्यामुळे, तो आता जीएनआयएएलच्या 30 वर्षांच्या सवलत कालावधीसह सह-टर्मिनस होईल, ज्यामुळे विमानतळ दुसऱ्या संयुक्त उद्यम-जीएनआयएएलकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग प्रशस्त होईल. यामुळे नागपूर विमानतळाच्या विकास आणि पायाभूत सुविधांच्या उन्नतीच्या एका नवीन पर्वाची सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. खाजगी क्षेत्राची कार्यक्षमता आणि सरकारी देखरेखीमुळे, विमानतळात लक्षणीय गुंतवणूक, आधुनिकीकरण आणि सुधारित प्रवासी व मालवाहतूक सेवा अपेक्षित आहेत — जो विमान वाहतूक क्षेत्रातील भक्कम पायाभूत सुविधांच्या विकासाप्रति भारत सरकारचा दृष्टिकोन आहे.
जीएनआयएएल हे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जागतिक दर्जाच्या सुविधेत रूपांतर करण्याचे काम हाती घेईल. यामध्ये टप्प्याटप्प्याने विकास करून वार्षिक 3 कोटी प्रवाशांना हाताळण्याची अंतिम क्षमता गाठण्याची योजना आहे, ज्यामुळे हे विमानतळ मध्य भारतातील एक प्रमुख विमानतळ म्हणून स्थान मिळवेल. या परिवर्तनामुळे केवळ विदर्भ प्रांतातील संपर्क व्यवस्था विस्तारणार नाही, तर तेथील आर्थिक पायाभूत सुविधाही मजबूत होतील. माल हाताळणी क्षमतेतही लक्षणीय वाढ होईल.
***
नेहा कुलकर्णी / सुषमा काणे / श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai