Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सुवर्ण योजनांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

सुवर्ण योजनांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

सुवर्ण योजनांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

सुवर्ण योजनांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

सुवर्ण योजनांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

सुवर्ण योजनांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

सुवर्ण योजनांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

सुवर्ण योजनांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य


उपस्थित सर्व सजन्न हो!

आपण लहानपणापासून ‘सोने पे सुहागा’ ही म्हण ऐकत आलो होतो. पण आतापर्यंत समजत नव्हते की ‘सोने पे सुहागा’ म्हणजे काय? याचा अर्थ आज आपल्या अर्थमंत्र्यांनी आपल्याला लक्षात आणून दिला. या योजना देशासाठी खऱ्या अर्थाने या म्हणीचा अर्थ सार्थ ठरवत आहेत; आणि आपला असा गरीब देश आहे की ज्याच्याकडे २० हजार टन सोने नुसते पडून आहे. त्यामुळे भारताला गरीब वाटून घेण्याचे काही कारण नाही. कोणताही तर्क समजवू शकत नाही की, आपण गरीब का रहावे? जर आपण थोडा प्रयत्न केला, योग्य दिशेने प्रयत्न केला, तर आपल्यावर जो शिक्का आहे, तो शिक्का आपण पुसून टाकू शकतो, आणि त्या मार्गावरील एक महत्वपूर्ण पाऊल म्हणजे या सुवर्ण संबंधित योजना.

मी लहानपणापासून ऐकत आलो होतो अर्ध्या रात्री सोने कामास येते, घेऊन ठेवा. कधी गरज पडली तर कामास येई; पण मी हजारो लोकांना विचारले की तुमच्यावर कधी अशी परिस्थिती आली आहे का? मला अजून तरी कोणी भेटले नाही, ज्याला अर्ध्या रात्री त्याचा उपयोग झाला असेल. पण मानसिकरीत्या त्याच्या डोक्यात पक्के आहे की, अर्ध्या रात्रीही सोने कामास येईल. या पक्क्या झालेल्या विचारातून समाजाला बाहेर पडणे सोपे नाही. कितीही सुशिक्षित व्यक्तीला सांगा की सोड सोन्याचा नाद, सोपे नाही. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरकडेही त्यांच्या पत्नीने सोन्याची मागणी केली तर त्यांना ते आणावे लागेल. सोन्यासंबंधी त्यांचे अर्थशास्त्र वेगळे आहे, पण गृहशास्त्र वेगळेच सांगेल. तर या ज्या काही व्यवस्था आहेत यामध्ये आपल्याला काही नाविन्यपूर्ण काम करायला हवे. दुसरा एक समज आपल्या देशात असा आहे की भारतीय स्त्रियांजवळ काहीही नसते.

घर आहे तर नवऱ्याच्या नावावर, वडिलांच्या नावावर, गाडी आहे तर नवरा किंवा मुलाच्या नावावर, शेत आहे तर वडिलांच्या नावावर; स्त्रीच्या नावावर काय? पण बारकाईने पहाल तर सोने म्हणजे स्त्रियांच्या ताकदीची गोष्ट असते. ही अशीच बनलेली व्यवस्था नाही. एक घटक जो सामाजिक व्यवस्थेचा मोठा बळकट भाग आहे, महिला सबलीकरणाचा महत्वपूर्ण पैलू आहे. तिच्या नावावर घर नसेल, पण तिच्याजवळील ही संपत्ती तिच्या मालकीची असते. कुटुंबातही तिला याबाबत प्रश्न केला जात नाही, मुलगी पण प्रश्न नाही विचारात, हे तर आईचे आहे. हा जो आपल्या संस्कारांचा एक उत्तम पैलू आहे, ज्यांनी महिला सबलीकरणासाठी सोन्याच्या मदतीने अशी सामाजिक व्यवस्था विकसित केली आहे, आपली रचना विकसित केली आहे ज्याला कायम केले पाहिजे. आपल्या माता भगिनींमध्ये जी सुरक्षेची भावना आहे, ती कायम राहिली पाहिजे. या योजनांद्वारे आपण विश्वास निर्माण करू शकलो तर कदाचित याच्या यशाचे कारण स्त्रिया असतील. दुसरे आपण पहिले आहे की संपन्न कुटूंबांचे कौटुंबिक डॉक्टर असतात. मध्यमवर्गीयांचे देखील असतात पण गरीब, कनिष्ठ वर्गीय परीवारांचे कौटुंबिक डॉक्टर नसतात पण आपल्या देशात प्रत्येक परिवाराचा कौटुंबिक सोनार नक्की असतो. किती मोठा विश्वास असतो. तीन-तीन, चार-चार पिढ्या तोच सोनार असतो. अमेरिकेत गेला तरी आपल्या गावातील सोनार शोधत येईल आणि म्हणेल मी हे पाठवतोय मला ते बनवून दे. ही विश्वसनीयता वर्षोनुवर्षे केलेल्या तपस्येतून मिळते. त्या ताकदीला देखील आपल्याला ओळखायला हवे. त्यामुळे या योजनांविषयी माझ्याशी चर्चा होत होती तेव्हा श्रीयुत दास यांना मी म्हणालो की गावातील लहान लहान सोनार आहेत, ते आपल्या योजनेचे एजंट कसे बनू शकतील? एक काळ असा होता १९६८ मध्ये सोनार सरकारचा सर्वात मोठा शत्रू बनला होता. मी लहानपणी गुजरातमधील पार्टन नावाच्या शहरात काही काळ घालवला. मी ज्या गल्लीत राहायचो ती सोनार गल्ली होती. तिथे एक सद्‌गृहस्थ होते, त्यांचा एक दिनक्रम असे, सकाळी वर्तमानपत्र आले की सिगारेट पेटवायची आणि त्यात जिथे कुठे मोरारजींचा फोटो असेल तो जाळायचे. इतका राग ते करायचे. कारण त्यांना वाटायचे की आमची तर सर्व कमाई गेली. या योजनांद्वारे आपण अशी व्यवस्था विकसित करू ज्यामुळे त्याला पुन्हा बळ मिळेल. तो आपला व्यावसायिक एजंट कसा बनू शकेल, बँकांपेक्षा लोकांना गावातील सोनारावर अधिक विश्वास आहे. मोठमोठ्या दुकानात जाऊन सोने खरेदी करतील आणि आपल्या गावातील सोनाराकडून तपासून घेतील. ही आपल्या व्यवस्थेची एक खूप मोठी साखळी बनू शकते. ही रचना आधीपासून उपलब्ध आहे. आपण त्यांना सुवर्ण रोखेंसाठी कसे प्रेरीत करू शकतो, त्यांना कसा विश्वास देऊ शकतो. माझी इच्छा आहे विभागातील लोकांनी यावर विचार करावा. जर आपण हे करू शकलो तर हे एकदम वाढेल. कोणतीतरी सरकारी योजना अर्थसंकल्पात यावी आणि इतक्या कमी काळात लागू व्हावी… धनत्रयोदशीचे महत्व लग्न कार्याहून अधिक आहे त्यामुळे या धनत्रयोदशीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सोन्याची सर्वात जास्त आयात याच काळात झाली असेल. कारण लोकांना वाटत असेल की मोठा बाजार खुला होणार आहे. आपण दरवर्षी एक हजार टन सोने आयात करतो आणि ही इतकी मोठी शक्ती आहे,विना उपयोग पडून राहिली तर असे होईल की कोणी खूप मोठा जलाशय, धरण बांधले आहे, कोट्यावधी रुपये खर्च केले असतील, पण जर कॅनल नेटवर्क नसेल आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही तर त्याचा काय उपयोग? आपल्या २० हजार टन सोन्याची हीच दश आहे. आपल्याला याला राष्ट्र शक्तीमध्ये परावर्तीत करावे लागेल आणि सामाजिक सुरक्षेत अधिक बलवान बनवायचे आहे. हा सामाजिक सुरक्षेचा पैलू आपल्याला अधिक बळकट करायचा आहे. राष्ट्राच्या विकास यात्रेत हे मोठी भूमिका बजावू शकतात, असा विश्वास आपल्याला निर्माण करायचा आहे, यंत्रणा लावायची आहे. आज लोकांना एक चिंता तर असते की १५ दिवस बाहेर चाललो आहे तर सोने कुठे ठेवायचे? नातेवाईकांकडे तरी कसे ठेवायचे. हा सर्वात मोठा सुरक्षेचा ताण आहे. या योजनांमुळे तो संपतो. त्याला विश्वास बसतो की माझा पैसा सुरक्षित आहे. कधी कधी व्यक्ती पैशांच्या थैल्या कुठे ठेवणार म्हणून सोने घेते. इतक्या छोट्या रुपात सोने येते तर पैशांच्या मोठ्या थैल्या कशाला… आपल्याला माहित आहे ते सर्व… पण आता रोखे स्वरुपात चार कागद घरात ठेवेल तर चोर पण हात लावणार नाही. म्हणेल हा कागद काय न्यायचा, बेकार आहे. म्हणजे सुरक्षेची हमी आहे. हे रोखे तो विकू पण शकतो. सोने अर्ध्या रात्री खरंच विकता आले, हे माझ्या ऐकिवात नाही.

पण विश्वासाने सांगतो की गोल्ड बॉंड गरज पडली तर अर्ध्या रात्री विकू शकतो. कधी दवाखान्यात जावे लागले, ऑपरेशन करावे लागले, डॉक्टर म्हणतो पहिले पैसे आणा, गोल्ड बॉंड दिले ऑपरेशन झाले. इतकी शक्यता तर सोन्यामध्ये नाही. म्हणजे यामध्ये plus point आहे. आपण या गोष्टी लोकांपर्यंत कशा पोहचवू, तशाच प्रकारे जमवलेले आणि पडून राहिलेले सोने बँकेमध्ये येईल आणि मोठ्या काळासाठी आले तर दागिन्यांसाठी जाईल. दागिन्यांसाठी गेले तर मी मानतो दागिन्यांमधील क्षेत्रातील लोकांना याप्रकारे सोने सहजरीत्या मिळेल, त्यांच्यासमोर प्रश्न नसतील. दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी बँकेमधून थेट मागणीनुसार स्थानिक पातळीवर सोने मिळणे हे आपल्या दागिन्यांच्या प्रसारासाठी सुलभ असेल आणि म्हणून जे दागिन्यांच्या जगाशी जोडलेले आहेत कारण आपण जगातील सर्वात मोठे सोने ग्राहक आहोत. आता मला काल कोणीतरी सांगत होते की आपण चीनला सुद्धा मागे टाकले आहे. बहुदा 462 टन इतके सोने आपण नऊ महिन्यात खरेदी केले आहे आणि चीन ५४८ वर आहे. जर आपण इतक्या वेगाने खरेदी करत आहोत, तर आपण बदल घडवू शकतो. मासिक निरीक्षण करून आपण उद्दिष्ट ठरवू शकतो की, या महिन्यात इतके सोने घरांमधून बँकेत येईल आणि या प्रमाणात बाहेरून येणे कमी होईल. यासाठी आपण ऑनलाईन निरीक्षण प्रणाली विकसित करू शकलो, तर या सर्व व्यवस्थेला आपण खरंच राष्ट्रहितासाठी,राष्ट्राच्या विकासकामात जोडू शकतो. यासोबत एक राष्ट्रीय स्वाभिमानाचाही मुद्दा आहे. काय कारण आहे की आज आपण परदेशी मार्कचे सोने…आणि शिवाय विचारतो अच्छा या मार्कचा आहे. मला नाव आठवत नाही, कारण माझा काही संबंध नाही, पण ऐकत आलो आहे. आता कोणीही विश्वासाने विचारेल की अशोकचक्र आहे का? माझ्या देशाला यावर विश्वास आहे का? असा आपण brand popular करायला हवा. आता आपण ठरवायला हवे की आता परदेशी चिन्हाचे सोने आम्ही स्वत: बाजारात देणार नाही. आम्ही दागिने विकणारे असू, आम्ही सोने विकणारे असू, आम्ही नाही असे करणार. आता या धनोत्रयोदशीला तर ठीक आहे की, कदाचित शंभर एक केंद्रांवरच मिळेल पण हळूहळू ही केंद्रे वाढतील. ज्या लोकांना धनत्रयोदशीला सोने खरेदी करायचे आहे त्यांना काही ठिकाणी मिळेल, पण हळूहळू वाढेल. तर ज्या लोकांना धनत्रयोदशीला सोने खरेदी करायची आहे, त्यांना काही ठिकाणी तर मिळेलच पण पुढे एक राष्ट्रीय स्वाभिमानाची ही गोष्ट झाली पाहिजे आणि याला बळ दिले पाहिजे. इतक्या कमी वेळात अर्थ मंत्री आणि त्यांच्या गटाने पूर्ण योजनेचा आराखडा केला, त्याचे लोकार्पण केले. यात तंत्रज्ञानही आहे आणि उत्पादकता देखील आहे. सर्व व्यवस्था नव्याने कराव्या लागल्या; पण त्या केल्या आणि ही मुद्रा मी पाहिली कदाचित मी रुपयावर जे गांधीजी पहिले आहे, या मुद्रेत त्यांची खूप सुंदर प्रतिमा उमटली आहे; म्हणजे ज्यांनी कोणी याचे रेखाचित्र तयार केले आहे त्यांचे मी अभिनंदन करतो. एक भाव निर्माण होतो आहे. तुम्ही पहाल तर लक्षात येईल. खूप छान रेखाचित्र केले आहे. या गोष्टींमध्ये मला रस असल्याने मी थोडा वेगळ्याप्रकारे पाहतो.

पण मी अभिनंदन करतो संपूर्ण चमूचे, अरुणजींचे विशेष अभिनंदन करतो. आणि देशबांधवांना शुभेच्छा देतो की धनत्रयोदशीच्या या पवित्र पर्वाला आणि दिवाळीच्या शुभेच्छांसह भारत सुवर्ण युगाकडे अग्रेसर होवो आणि तुमचे २० हजार टन सोने या दिशेने जाण्यासाठी पुरेसे आहे, असा माझा विश्वास आहे. या सुवर्णसंधीला दवडू नका, या सुवर्णकांचन योगाचा लाभ घ्या. हीच माझी अपेक्षा आणि शुभेच्छा आहे.

धन्यवाद!