पीएम्इंडिया
सूरतमध्ये झालेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेतल्या पीडितांना सर्वतोपरी साहाय्य करावे असे आदेश पंतप्रधानांनी गुजरात सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
“सुरतमधल्या आगीच्या दुर्घटनेमुळे मी अत्यंत व्यतीत झालो आहे. या घटनेतल्या पीडित कुटुंबांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेत जखमी झालेले लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना! घटनेतल्या पीडितांना आवश्यक ती सर्व मदत करावी असे आदेश संबंधितांना दिले आहेत” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
N.Sapre/R.Aghor/P.Malandkar
Extremely anguished by the fire tragedy in Surat. My thoughts are with bereaved families. May the injured recover quickly. Have asked the Gujarat Government and local authorities to provide all possible assistance to those affected.
— Narendra Modi (@narendramodi) May 24, 2019