Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सूरत आणि दमण भेटीची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सूरत आणि दमण येथील आपल्या अलीकडच्या दौऱ्यांची क्षणचित्रे सामायिक केली. सूरतच्या जनतेमध्ये उपस्थित राहणे हा अतिशय सुखावणारा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. या उत्साही शहरातून देशाने एकत्रितपणे भारताला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

दमण येथे केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांचे जीवन अधिक सुलभ होईल, असे मोदी यांनी सांगितले. आपल्या दौऱ्यातील विविध कार्यक्रमांतील काही महत्त्वाचे क्षण आणि ठळक बाबीही त्यांनी सामायिक केल्या.

एक्सवरील काही संदेशांमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की,

काल सूरतच्या जनतेशी संवाद साधताना अतिशय आनंद झाला. या उत्साही शहरातून भारताला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या आपल्या निर्धाराचा पुनरुच्चार करण्यात आला.

दमण येथे झालेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांचे जीवन अधिक सुलभ होईल. कालच्या विविध कार्यक्रमांतील काही ठळक क्षण येथे पाहता येतील.

***

माधुरी पांगे/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai