Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष मिशेल यांच्यासह पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष मिशेल यांच्यासह पंतप्रधानांनी 
प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष मिशेल यांच्यासह पंतप्रधानांनी 
प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष मिशेल यांच्यासह पंतप्रधानांनी 
प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष मिशेल यांच्यासह पंतप्रधानांनी 
प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष मिशेल यांच्यासह पंतप्रधानांनी 
प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष मिशेल यांच्यासह पंतप्रधानांनी 
प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन


सेशेल्सचे सन्माननीय राष्ट्राध्यक्ष मिशेल

प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी,

आपल्या विशेष स्नेह्याचे आपल्या घरी स्वागत करणे नेहमीच आनंददायी असते. राष्ट्राध्यक्ष मिशेल हे आमचे एक विशेष स्नेही आहेत.

या वर्षी मार्च महिन्यात राष्ट्राध्यक्षांनी माझे विशेष आदरतिथ्य केले होते. आज मलाही त्यांचे आदरतिथ्य करायला मिळते आहे याचा मला आनंद होत आहे.

ते दूरदृष्टीने आपल्या देशाचे नेतृत्व करत आहेत. हवामान बदलाच्या मुद्द्यावर, प्रामुख्याने छोट्या व बेटांच्या देशांच्या चिंतेवर ते जागतिक व्यासपीठावर आवाज उठवत आहेत.

महोदय, आम्ही तुमच्या देशाच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे. तुमच्या प्रगतीचे ही आम्ही कौतुक केले आहे.

मी सेशेल्स मध्ये जे बोललो त्याची मी पुनरावृत्ती करतो. उत्तुंग कामगिरी करण्यासाठी आकारमानाचे बंधन नसते हे तुमच्या देशाने दाखवून दिले आहे.

आमच्या संबंधातील प्रगतीसाठी राष्ट्राध्यक्ष मिशेल कारणीभूत आहे. आम्ही याचे महत्व जाणतो कारण सेशेल्स हा भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे.

ज्याप्रमाणे, आमचे हितसंबंध विस्तृत आहे. त्याचप्रमाणे आमच्यातील नात्याचा पाया खोल आहेत जसे की-आपली सामायिक तत्व, वांशिक संबंध, परस्पर विश्वास व आदर व समानतेसाठी असलेली भागीदारी. माझ्या मार्च महिन्यातील भेटीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयांवर आम्ही चांगली प्रगती करत आहोत. राष्ट्राध्यक्ष मिशेल यांनी आमच्यातील संबंधांना अधिक चालना दिली आहे.

हिंदी महासागरातील सागरी सुरक्षेबाबत आमच्यात विशेष सुरक्षा सहकार्य आहे.

सागरी देखरेखीसाठी विमानवाहू नौका, जहाज, सागरी रडार प्रणाली आदी पुरविण्यात सेशेल्स सहभागीदार झाल्याने आम्ही सन्मानित झालो आहे. हायड्रोग्राफी सर्व्हेतील आमचे व्यापक सहकार्य आहे. मी सांगितले आहे की भारत सेशेल्सला लवकरच एक अवरोधक तटरक्षक बोट भेट देईल.

मार्च महिन्यात मी घोषणा केली होती की भारत सेशेल्सला एक डॉर्निअर विमान भेट देईल. मला आपल्याला सांगताना आनंद होत आहे की आम्ही त्यासंदर्भात प्रक्रिया तत्काळ पूर्ण केली असून आज एका करारावर स्वाक्षऱ्याही केल्या आहेत.

सागरी किंवा नील अर्थव्यवस्थेवर मी आणि राष्ट्राध्यक्ष मिशेल दोघेही भर देतो. आम्हाला विश्वास आहे की आपण छोट्या बेटांकडे व्यापक क्षमता असलेले मोठे सागरी देश म्हणून पहिले पाहिजे.

नुकत्याच तयार झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयांमध्ये ‘महासागरे व सागरी संपत्तीचा शाश्वत वापर’ हा वेगळा घटक आहे हे बघून आम्हाला आनंद झाला.

नील अर्थव्यवस्थेसाठी सहकार्य वाढवण्याबाबत आमच्यात झालेले द्विपक्षीय करार या भागात शाश्वत सागरी अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उचललेले मोठे पाऊल आहे.

अवकाश विशेषत: भू व सागरी संपत्ती, मत्स्यव्यवसाय सल्लामसलत, हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात आम्ही सहकार्य वृद्धिंगत करणार आहोत.

सेशेल्समधील मान्यताप्राप्त बेटावर पायाभूत सुविधा विकसित करण्यास आम्ही सुरुवात केली आहे.

दोन्ही देशांतील वाहतूक संपर्क वाढविण्याबाबत आम्ही मार्च महिन्यात बोललो. हवाई सेवा कराराची दोन देशांतील वाहतूक अधिक सुसह्य होण्यास नक्कीच मदत होईल.

हवामान बदल हे जागतिक आव्हान आहे. सेशल्स सारख्या बेटराष्ट्रांना यामुळे मोठा धोका आहे. ७५०० किलोमीटरचा सागरी किनारा व १३०० बेटे असलेल्या भारतालाही त्याचा तितकाच धोका संभवतो.

शाश्वत भविष्यासाठी आम्हा दोन्ही देशांकडे महात्वाकांक्षी राष्ट्रीय योजना आहेत. या वर्षाखेर पॅरिस येथे होणाऱ्या COP 21 परिषदेदरम्यान सर्वंकष, समतोल व परिणामकारक तोडगा निघावा यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत.

७० व्या वर्धापनदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत सुधारणांची मागणी लावून धरण्याची आमची इच्छा आहे. विस्तारीत संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सभासदत्व मिळावे यासाठी सेशेल्सने दर्शविलेल्या पाठींब्याबद्दल आम्ही सेशेल्सची प्रशंसा करतो.

सामोआ पाथवेत दाखविलेल्या दृष्टीची जाणीव करून देण्यासाठी व आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांचा शक्तीस्त्रोत बनण्यासाठी छोट्या विकसनशील बेटांबरोबर काम करण्याची भारताला इच्छा आहे.

ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच परिषदेसाठी पाठींबा दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष मिशेल यांचा आभारी आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी करण्यात भरीव योगदान दिल्याबद्दल मी सेशेल्सचा आभारी आहे.

महोदय, आपण दोन विभिन्न आकाराचे देश आहोत. परंतु, हे नाते आंतरराष्ट्रीय भागीदारीचा उत्तम नमुना आहे. हे विशेष नाते आपल्या हितसंबंधाचे नेहमीच केंद्र राहील.

मला खात्री आहे की आपल्या नात्यातील मैलाचा दगड ठरलेले हे वर्ष आपल्यातील भागीदारीला आणखी बळकटी देईल.

खूप खूप धन्यवाद!

A.Desai/N.Sapre