पीएम्इंडिया
नमस्कार,
आमचे स्नेहपूर्ण स्वागत आणि आद रातिथ्यासाठी मी राष्ट्रपती एर्मिनी यांचे हार्दिक आभार मानतो .
त्यांच्याकडून गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन या पुरस्काराने सन्मानित होणे हा माझ्यासाठी आणि 140 कोटी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या सन्मानाचा मी विनम्रतेने स्विकार करत असताना तो त्या सर्व देशांना समर्पित करत आहे जे हवामान बदलाच्या आव्हानाशी लढत आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणाला भावी पिढ्यांप्रति आपली जबाबदारी मानत आहेत.
मित्रांनो,
माझा हा दौरा अशा ऐतिहासिक वेळेस होत आहे, जेव्हा सेशेल्स आपल्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे पूर्ण करत आहे आणि भारत व सेशेल्स यांच्या राजनैतिक संबंधांना देखील पन्नास वर्ष होत आहेत.
या पन्नास वर्षाच्या प्रवासात आम्ही मैत्रीला विश्वासात, विश्वासाला सहकार्यात आणि सहकार्याला जन कल्याणामध्ये बदलले आहे.
मित्रांनो,
हिंदी महासागराने शतकानुशतके भारत आणि सेशेल्स यांच्यातील संबंध जोपासले आहेत . त्याच्या लाटांनी आमच्यामधील व्यापार, संस्कृती आणि मानवी संबंधांना सातत्याने पोसले आहे. आमच्या यावर विश्वास आहे की, हिंदी महासागर हे आमचे एकत्रित घर आहे. त्याची सुरक्षा, टिकाऊपणा आणि समृद्धता ही आमची सामायिक जबाबदारी आहे. हीच भावना आमच्या महासागर या दृष्टीकोनाचाही आधार आहे.
मित्रांनो,
या वर्षी फेब्रुवारी मध्ये अध्यक्षांनी आपल्या भारत दौऱ्यामध्ये जारी केलेल्या एका संयुक्त व्हिजनमधून आमच्या भविष्यातील भागीदारीचा आराखडा तयार करण्यात आला होता. यावर पुढे वाटचाल करताना आमचे परस्पर सहकार्य अधिक मजबूत होणार आहे.
आज आम्ही आमच्या आर्थिक सहकार्याला अधिक मजबूत आणि भविष्यवेधी करण्यावर चर्चा केली आहे. आम्ही दोन्ही देशांसाठी उद्योगांच्या नव्या संधींचा शोध सुरुच ठेवणार आहोत.
भारत आणि सेशेल्स यांच्यातील संपर्क सुविधा सुधारण्यासाठी देखील काम केले जाईल. यामुळे दोन्ही देशांतील व्यापाराला चालना मिळेलच, शिवाय पूर्व आफ्रिका आणि हिंदी महासागर क्षेत्राशी असलेले संबंधही अधिक दृढ होतील.
डिजिटल तंत्रज्ञान हे दोन्ही देशांतील भौगोलिक अंतर कमी करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असा आमचा विश्वास आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील भारताचा यशस्वी अनुभव आम्ही सेशेल्ससोबत सामायिक करू. तसेच, सेशेलमध्ये यूपीआय सुरू करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात येत असल्याचा मला आनंद आहे.
मित्रांनो,
विकास भागीदारी ही भारत-सेशेल्स संबंधांची एक महत्त्वाची ओळख आहे. भारताने नेहमीच सेशेल्सच्या प्राधान्यक्रमांना, गरजांना आणि आकांक्षांना केंद्रस्थानी ठेवून सहकार्य केले आहे.
राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान आम्ही 175 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. या अंतर्गत सामाजिक गृहनिर्माण, वाहतूक, कौशल्य विकास, अन्नसुरक्षा, शिक्षण आणि संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये काम सुरू आहे. सेशेल्समधील मानवी संसाधन विकासाला सहकार्य करणे ही भारताची विशेष प्राथमिकता राहिली आहे.
सेशेल्समधील नागरी सेवकांच्या प्रशिक्षणात भारत योगदान देत असल्याचा मला आनंद आहे. आज प्रोफेशनल अँड टेक्निकल सेंटरच्या आभासी भूमिपूजनाचाही कार्यक्रम होत आहे. हे केंद्र भविष्यात सेशेल्सच्या युवकांच्या कौशल्य, रोजगाराच्या संधी आणि आत्मविश्वासाला नवी उंची देईल, असा आमचा विश्वास आहे.
मित्रांनो,
आरोग्य क्षेत्रातील भारत-सेशेल्स भागीदारीने काळाच्या कसोटीवर आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. कोविडसारख्या कठीण काळात लसींचा पुरवठा करून भारताने खऱ्या मित्राची भूमिका निभावली.
आज जनऔषधी संदर्भात झालेल्या सामंजस्य करारामुळे सेशेल्सच्या नागरिकांना उत्तम दर्जाची आणि परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्याला सहकार्य मिळेल. क्षमता विकास आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सेशेल्समधील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यातही भारत सातत्याने प्रयत्न करत राहील.
***
सुषमा काणे/राजेश शिरभाते/श्रद्धा मुखेडकर/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Addressing the joint press meet with President Dr. Patrick Herminie of Seychelles.@StateHouseSey https://t.co/bSamrxysiR
— Narendra Modi (@narendramodi) June 28, 2026
हमारे स्नेहपूर्ण स्वागत और आतिथ्य-सत्कार के लिए मैं राष्ट्रपति एर्मिनी का हार्दिक आभार व्यक्त करता हूँ।
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
उनके द्वारा “Guardian of the Blue Horizon” से सम्मानित किया जाना मेरे लिए और 140 करोड़ भारतवासियों के लिए अत्यंत हर्ष का विषय है।
मैं इस सम्मान को विनम्रतापूर्वक स्वीकार करते…
हिन्द महासागर ने सदियों से भारत और सेशेल्स के संबंधों को सींचा है।
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
इसकी लहरों ने हमारे बीच व्यापार, संस्कृति और मानवीय संबंधों को निरंतर पोषित किया है।
We believe the Indian Ocean is our shared home;
Its security, sustainability and prosperity are our shared responsibility.…
आज हमने हमारे आर्थिक सहयोग को और अधिक resilient और future-ready बनाने पर चर्चा की।
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
हम दोनों देशों के उद्योगों के लिए नए अवसरों की तलाश जारी रखेंगे।
भारत और सेशेल्स के बीच connectivity बढ़ाने पर भी काम किया जाएगा: PM @narendramodi
हमारा विश्वास है कि Digital Technology दोनों देशों के बीच की दूरी को कम करने का प्रभावी माध्यम है।
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
हम Digital Public Infrastructure में भारत के सफल अनुभव को सेशेल्स के साथ साझा करेंगे।
और मुझे प्रसन्नता है कि आज UPI को सेशेल्स में लागू करने के लिए MOU किया जा रहा है: PM…
स्वास्थ्य के क्षेत्र में हमारी साझेदारी समय की कसौटी पर खरी उतरी है।
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
कोविड के मुश्किल समय में vaccines की आपूर्ति से हमने एक मित्र के रूप में अपना दायित्व निभाया।
आज जन औषधि पर किए गए MoU से सेशेल्स के लोगों को quality और affordable medicines उपलब्ध कराने में सहायता मिलेगी: PM…
मेरी सेशेल्स की यात्रा का संदेश स्पष्ट है:
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
भारत ऐसे हिंद महासागर की कल्पना करता है, जहाँ समुद्री सुरक्षा के साथ आर्थिक समृद्धि भी बढ़े;
जहाँ हमारी साझेदारी आकार नहीं, आपसी सम्मान और विश्वास पर आधारित हो;
और जहाँ हम हर देश के पास-पास नहीं, साथ-साथ चलें।
Our vision is to make…