Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी राष्ट्राच्या आत्मविश्वासाचा हुंकार असल्याची भावना मांडणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्ली, 11 मे 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लिहिलेला एक लेख आज समाजमाध्यमांवर सामायिक केला आहे. या लेखात,सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी, नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताचा, राष्ट्र म्हणून आत्मविश्वासपूर्ण हुंकार असल्याची भावना, गोयल यांनी व्यक्त केली आहे.  

देशात सोमनाथ अमृत महोत्सव सुरू असल्याचे नमूद करत, या लेखात, विरोधाचा सामना करूनही पुनर्बांधणी झालेल्या मंदिराचे उद्घाटन कसे करण्यात आले, याचे वर्णन केल्याचे पंतप्रधानांनी संगितले आहे. हा मैलाचा दगड, भारताचे सांस्कृतिक पुनरुज्जीवन आणि स्वाभिमानाची बीजे रोवणारा ठरला होता, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले आहे:

“देशात जेव्हा सोमनाथ अमृत महोत्सव सुरू आहे, अशा वेळी, केंद्रीय मंत्री @PiyushGoyal यांनी, सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी, नव्या स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय आत्मविश्वासाची अभिव्यक्ती होतीम असे वर्णन आपल्या लेखात केले आहे.

तत्कालीन राजकीय नेतृत्वाचा विरोध पत्करूनही, या पुनर्बांधणी केलेल्या मंदिराचा उद्घाटन सोहळा झाला होता, असे अधोरेखित करत, हा सोहळा भारताचे सांस्कृतिक पुनरुज्जीवन आणि स्वाभिमानाचे बीजारोपण करणारा ठरला, असे या लेखात म्हटले आहे..”

नेहा कुलकर्णी/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai