पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत 16 वी लोकसभा विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव आता राष्ट्रपतींकडे जाणार आहे. 16 व्या लोकसभेची स्थापना 18 मे 2014 रोजी करण्यात आली होती.
पार्श्वभूमी:-
भारतीय राज्यघटनेच्या कलम 83(2) नुसार लोकसभा वेळेआधी काही कारणाने विसर्जित झाली नसेल तर हिचा संपूर्ण कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. 16 व्या लोकसभेची पहिली बैठक 4 जून 2014 ला झाली होती. त्या दिवशी सर्व सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यामुळे या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून 2019 ला संपणार आहे.
N.Sapre/R.Aghor/P.Malandkar