पीएम्इंडिया
“गो रक्षणाच्या नावाखाली दुकान चालवणाऱ्या” स्वयं घोषित गो रक्षकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राग व्यक्त केला आणि गो रक्षकांचे सोंग करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली. सह्भागात्मक प्रशासनासाठीच्या सरकारचे वेब व्यासपीठ MyGov च्या द्विवर्षपुर्ती निमित्त युनिक टाऊन हॉल मध्ये संवाद साधताना पंतप्रधानांनी राज्य सरकारांना अशा व्यक्तिंची फाईल तयार करण्याचे आवाहन केले. प्लास्टिक खाऊन कशाप्रकारे गाईंचा मृत्यू होत आहे हे नमूद करताना त्यांनी सर्वांना विनंती केली की ज्यांना खरच गाईंच्या कल्याणाची काळजी आहे, त्यांनी गाई प्लास्टिक खाणार नाहीत याकडे लक्ष दयावे.
पंतप्रधानांनी यावेळी सुप्रशासन, विदेश नीती आणि सह्भागात्मक लोकशाही यासारख्या अनेक विषयांवरच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
मतदान केल्यानंतर नागरिकांची भूमिका संपते असा जर कोणी विचार करत असेल तर लोकशाहीचे चैतन्य तिथे अपूर्ण आहे असे मोदी म्हणाले. सह्भागात्मक लोकशाही आवश्यक आहे यावर त्यांनी जोर दिला. योजनान इतकेच महत्त्व ‘शेवटच्या मैला पर्यंत पोहोचण्याला’ आहे आणि या योजनांचा लाभ संकल्पित लाभार्थ्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. मोदी म्हणाले की, सुप्रशासन म्हणजे अशी प्रक्रिया जिथे अनावश्यकतेला स्थानाच नाही. तक्रार निवारण प्रणाली ही लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती असल्याचे मोदी यांनी यावेळी नमूद केले.
नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेला बळकटी प्रदान करणारे जर कुठले क्षेत्र असेल तर ते कृषी क्षेत्र आहे. रूरबन अभियानाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणले की, गावांचा आत्मा जपून ग्रामीण क्षेत्राला आधुनिक सोयीसुविधा पुरवणे हे त्यांचे स्वप्न आहे.
हाथमाग या विषयावर बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, “देशासाठी खादी, खादीसाठी फॅशन “
विदेश नीतीसाठी “इंडिया फस्ट” ही मुख्य थीम असल्याचे पंतप्रधान म्हणाले. इतर देशांसोबत भारताला जोडण्यामध्ये अप्रवासी भारतीयांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.
१०० मिनिटे चाललेल्या या संवादा दरम्यान पंतप्रधानांनी आरोग्य आणि पर्यटन यासारख्या विषयांवर देखील चर्चा केली.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन कि बात कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या आणि MyGov या वेब पोर्टल चा उपयोग करणाऱ्यांसोबत व्यासपीठावरून संवाद साधला.
पंतप्रधानांनी यावेळी नवीन पी एम ओ एपचे उद्घाटन केले आणि हे एप विकसित करायला मदत करणाऱ्या तरुण उदोजाकांना भेटले.