Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन वाढवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची कार्योत्तर मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वातंत्र्यसैनिक सन्मान पेन्शन योजना, 1980 अंतर्गत स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या विधवा / विधुर, पती-पत्नी, पात्र मुलीं आणि मृत सैनिकांच्या आश्रित मालकांसाठी निवृत्तीवेतनाची रक्कम वाढवण्याला कार्योत्तर मंजुरी दिली.

पुनर्रचित निवृत्तीवेतन पुढीलप्रमाणे:-

1

अंदमान राजकीय कैदी / त्यांचे पती-पत्‍नी

रु. 24775

रु. 30000

2

ब्रिटीश इंडियाबाहेरील स्वातंत्र्यसैनिक

रु. 23085

रु. 28000

3

अन्य स्वातंत्र्यसैनिक आयएनए सहित

रु. 21395

रु. 26000

4

आश्रित पालक/पात्र मुली (कमाल 3 मुली)

रु. 3380

स्वातंत्र्यसैनिकांच्या 13 ते 15 हजार दरम्यान रकमेपैकी 50 टक्के

अनु. क्र. स्वातंत्र्यसैनिकांची श्रेणी निवृत्तीवेतनाची सध्याची रक्कम
(दर महिना)
वाढीव निवृत्तीवेतन रक्कम
(दर महिना)

 

  1. सुधारित निवृत्ती वेतन 15.8.2016 पासून लागू झाले. महागाई भत्ता मोजण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारकाच्या संबंधित श्रेणीचे सुधारित निवृत्ती वेतन मूळ निवृत्ती वेतनात धरले जाईल.
  2. औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित सध्याची महागाई भत्ता प्रणाली, जी आतापर्यंत स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतनधारकांना लागू होती, ती रद्द करण्यात येत असून, त्या जागी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेली महागाई भत्ता प्रणाली लागू होईल.

सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि मृत स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळेल.

 

B.Gokhale/S.Kane/D. Rane