पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक पिंगली वेंकय्या यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
देशाला तिरंगा ध्वज प्रदान करण्यात पिंगली वेंकय्या यांनी बजावलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करत पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांचे कार्य देशसेवा, समर्पण आणि देशभक्तीच्या भावनेने कार्य करण्यासाठी आजही प्रत्येकाला प्रेरणा देत आहे.
प्रत्येक भारतीयाच्या हृदयात तिरंगा प्रचंड अभिमानाची भावना जागवतो आणि राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे :
“पिंगली वेंकय्या यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आपल्या देशाला तिरंगा ध्वज प्रदान करण्यात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी त्यांचे सदैव स्मरण केले जाईल. त्यांचे कार्य देशसेवा, समर्पण आणि देशभक्तीच्या भावनेने कार्य करण्यासाठी कायम प्रेरणा देत राहो.
तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात प्रचंड अभिमान निर्माण करतो आणि राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो.”
Tributes to Pingali Venkayya Ji on his 150th birth anniversary. He is remembered for his invaluable role in giving our nation the Tricolour. May his efforts always inspire people to serve our country with dedication and patriotic fervour.
The Tiranga fills every Indian heart…
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2026
***
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai