Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वामी आत्मस्थानंदाजींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्‍वामी आत्मस्थानंदाजीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

“स्वामी आत्मस्थानंदाजींच्या निधनामुळे माझी वैयक्तिक हानी झाली आहे. माझ्या आयुष्यातील खूप महत्वपूर्ण काळ मी त्यांच्यासोबत व्यथित केला आहे.

स्वामी आत्मस्थांनदाजी अमाप ज्ञानाचे धनी होते. त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व अनेक पिढयांच्या स्मरणात राहिल.
मी जेव्हा कधी कोलकत्याला जायचो तेव्हा नेहमीच स्वामी आत्मस्थानंदाजींचे आशीर्वाद घेण्यासाठी जायचो.

स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी अथक कार्य केले आणि त्याचा प्रचार जगभर केला” असे पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha