Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वित्झरलँड दौऱ्या दरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

स्वित्झरलँड दौऱ्या दरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन


महामहिम राष्ट्रपती जॉन श्नाइडर-अम्मान,

मित्रांनो, महामहिम, तुमच्या उल्लेखनीय वक्तव्याबद्दल आणि उदार आदरातिथ्याबद्दल तुमचा आभारी आहे. या आंतरराष्ट्रीय किर्तीचे शहर-जिनेवामध्ये तुमच्या सोबत उभे राहून याचे ऐतिहासिक महत्व मी अनुभवत आहे. एकंदरीतच हे “रेड क्रॉस”चे घर आहे आणि मानवी सेवेला अर्पण केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे मुख्यालय येथेच आहे.

मित्रांनो,

भारत आणि स्वित्झरलँड हे दोन्ही देश जगामध्ये, शांती, सामंजस्य आणि मानवी मूल्यांविषयी बोलतात मागील सात दशकांची आपली मैत्री आहे. आज राष्ट्रपती आणि मी दोघांनी अनेक क्षेत्रातील द्विपक्षीय करारांचा आढावा घेतला. आम्ही स्वित्झरलँडच्या अनेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत व्यापक चर्चा देखील केली.

मित्रांनो,

आपल्यासारख्या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि तिचा निरंतर विकास होत आहे. कित्येक स्विस कंपन्यांचे भारतात खूप चांगले नाव आहे. व्यापार, गुंतवणूक, विज्ञान व तंत्रज्ञान आणि कौशल्‍य विकासातील करारांमुळे दोन्ही देशातील नागरिकांना फायदा होत आहे. भारताने सांगितले आहे की तो ईएफटीए सोबत एफटीएवर चर्चा करण्यासाठी तयार आहे. आपल्या सर्वांना स्विस अर्थव्यवस्थेच्या मजबूतीची कल्पना आहे, परंतू भारत देखील परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. आज आम्ही जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहोत. परंतू हे पुरेसे नाही. माझी इच्छा आहे की, भारतीय अर्थव्यवस्था स्मार्ट आणि शाश्वत शहर, मजबूत कृषी क्षेत्र आणि गतीशील निर्मिती आणि चैतन्यपूर्ण सेवा क्षेत्राच्या आधारे प्रगती करावी आणि याला जागतिक दर्जाच्या रेल्वेचे जाळे, रस्ते, विमानतळ आणि डिजिटल कनेक्टिव्हीने बळकटी मिळावी, जिथे सर्वांसाठी घर असेल आणि प्रत्यक्षात प्रत्येक घरात वीज असेल. आणि आपले 50 कोटींहून अधिक युवक कुशल असतील जे जागतिक मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी तयार असतील. भारताच्या आवश्यकतेनुसार स्विस व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रशिक्षण प्रणाली तयार करण्यावर माझे आणि राष्ट्रपतींचे एकमत झाले आहे. आम्ही काल जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. जीवाश्म इंधनाऐवजी नवीकरणीय ऊर्जेसोबतच आपण पुढे जाऊ शकतो.

मित्रांनो,

आमच्या विकासाच्या गरजा आणि स्वित्झरलँडच्या क्षमतांमध्ये आम्हाला एक योग्य जोडणी दिसून येते. आणि म्हणूनच भारताच्या आर्थिक विकासात मुख्य भागीदार बनण्याकरिता आणि भविष्यात येथे उपलब्‍ध होणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी मी स्विस कंपन्यांना आमंत्रित करतो. अंतिमत: 1.25 अब्जाहून अधिक लोकांच्या आर्थिक संपन्नतेचा संपूर्ण जगाला फायदा होईल.

मित्रांनो,

सध्याचे जागतिक वास्तव्य लक्षात घेता आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करायला भारत आणि स्वित्झरलँड एकत्रितपणे कटिबध्द आहोत. संयुक्त राष्ट्र परिषदेचे अस्थायी सदस्यपद मिळावे याकरिता एकमेकाला सहकार्य करायला दोन्ही देशांनी अनुमती दर्शविली आहे. अणूऊर्जा पुरवठादार गटाच्या भारताच्या सदस्यतेला समजून त्याला पाठिंबा दिल्याबाबत मी स्वित्झरलँडच्या राष्ट्रपतींचा आभारी आहे. काळा पैसा आणि करचोरी विरुध्दचा लढा ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. कर चोरी संदर्भातल्या गुन्हयांच्या माहितीचे आदान-प्रदान जलदगतीने करण्यासंदर्भातल्या माहितीचे स्वयंचलित पध्दतीने आदान-प्रदान करण्याच्या करारावरील चर्चा अधिक महत्वपूर्ण असेल.

मित्रांनो,

दोन्ही देशांमधील लोकांमधील परस्पर संबंध हे आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. भारतीय चित्रपट उद्योगाचा मी आभारी आहे ज्यांनी स्वित्झरलँडच्या प्रेक्षणीय स्थळांच्या सुंदरतेची आम्हाला ओळख करुन दिली. परंतू आम्ही देखील अधिकाधिक स्वित्झरलँड पर्यटकांचे भारतात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. यासाठी आम्ही स्विस नागरिकांसाठी यावर्षाच्या सुरुवातीलाच ई-व्हिजा सुविधा सुरु झाली आहे.

मित्रांनो,

दोन्ही देशांच्या अनेक यशोगाथा आहेत. यामध्ये टेनिस जगतात ग्रँड स्लॅन स्पर्धेत आपले वर्चस्व सिध्द करत असलेली प्रसिध्द स्विस खेळाडू मार्टिना हिंगिस सोबत भारताची सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस आणि त्याचा स्विस जोडीदार यांचा समावेश आहे. मला विश्वास आहे की, आपली समान कटिबध्दता व मूल्य, व्यक्ती-व्यक्तीमधील परस्पर संबंध आणि वाढती आर्थिक भागिदारी यामुळे आपले संबंध नवीन उंची गाठतील. मी पुन्हा एकदा जिनेवामधील माझ्या आदरातिथ्यासाठी महामहिम यांचे आभार मानतो.

धन्यवाद, खूप खूप धन्यवाद !

S.Mhatre/B.Gokhale