पीएम्इंडिया
हिंदुस्तान केबल्स लिमिटेड, कोलकाता बंद करण्यासाठी पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना आकर्षक व्हीआरएस/व्हीएसएस पॅकेज देण्यात येणार आहे.
जानेवारी 2003 पासून कंपनीतले उत्पादन बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यांना 1997ची वेतनश्रेणी दिली जात आहे. त्यांना 2007च्या वेतनश्रेणीनुसार पॅकेज दिले जाईल तसेच 2015 पासूनची वेतनासहित थकबाकीही दिली जाईल.
N.Sapre/S. Kakade/P. Kor