Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

103 वर्षाच्या शर्बती देवी यांनी पंतप्रधानांना केले रक्षाबंधन


शर्बती देवी या 103 वर्षाच्या वृद्ध विधवा महिलेने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि पंतप्रधानांना राखी बांधली. शर्बती देवी यांच्या भावाचे 50 वर्षांपूर्वी निधन झाले आणि दरवर्षी राखी पौर्णिमेला त्यांना भावाची आठवण यायची. त्यांच्या मुलाने पंतप्रधानांना पत्र लिहिले आणि त्यानंतर पंतप्रधानांनी शर्बती देवी आणि त्यांच्या कुटुंबियांना आज आपल्या निवासस्थानी निमंत्रित केले. शर्बती देवी यांना पंतप्रधानांना भेटून खूप आनंद झाला आणि त्यांनी पंतप्रधानांना राखी बांधली. त्यांनी एकमेकांशी छान गप्पा मारल्या.

******

B.Gokhale/S.Kane/P.Kor