Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

#10YearsOfMyGov: सुशासनासाठी परिपक्व आणि उत्साहवर्धक मंच असल्याचे पंतप्रधानांकडून कौतुक


नवी दिल्‍ली, 26 जुलै 2024

MyGov हा मंच सुरू होऊन आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंचाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. सुशासनासाठी हा एक परिपक्व मंच असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे.

MyGov मंचाला ज्यांनी महत्त्वाचा दृष्टिकोन दिला आणि माहितीद्वारे या मंचाला समृद्ध केले त्या सर्व सहभागींचे पंतप्रधानांनी आभार मानले.

पंतप्रधान X वर म्हणाले:

“#10YearsOfMyGov. हा मंच सुरू होऊन आज  10 वर्षे झाली आहेत. ज्यांनी या व्यासपीठाला समृद्ध केले आणि अंतर्दृष्टी देऊन माहितीही उपलब्ध करून दिली त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. गेल्या दशकभरात, MyGov मंच नागरिकांनी नोंदवलेल्या मोठ्या सहभागामुळे सुशासनासाठी एक उत्साहवर्धक मंच म्हणून उदयास आला आहे.”

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai