Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

12 व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफला 12व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“एनडीआरएफला 12व्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. आपत्ती प्रतिसाद, मदत आणि बचाव कार्य या साऱ्यात एनडीआरएफ करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे.

प्रणाली, प्रक्रिया आणि क्षमता निर्मिती मजबूत करण्यावर एनडीआरएफ लक्ष्य केंद्रीत करीत आहे, ज्यामुळे जिवीत वा मालमत्तेची कमीत कमी हानी होण्यास मदत होईल”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/J.Patankar/Anagha