पीएम्इंडिया
18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. चालू वर्षातील या दोन्ही नेत्यांची ही दुसरी भेट होती. यापूर्वी 31 ऑगस्ट 2026 रोजी बिश्केक इथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या 26 व्या शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.
या बैठकीत दोन्ही नेत्यांनी राजकीय, आर्थिक, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, कौशल्यांची देवाण घेवाण तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. 9 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान भारतात पहिल्यांदाच इनोप्रॉम इंडिया या रशियाच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचेही त्यानी स्वागत केले, व्यापार आणि औद्योगिक संबंधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्वाचे असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. दोन्ही नेत्यांनी इनोप्रॉम इंडिया प्रदर्शनाला भेट देऊन तिथल्या सहभागींशी संवादही साधला.
विविध बहुपक्षीय मंचावरील विशेषतः 2026 या वर्षासाठीच्या भारताच्या अध्यक्षतेअंतर्गत ब्रिक्स मधील भारत आणि रशियाच्या सहभागाबद्दलही दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली. याशिवाय त्यांनी परस्पर हिताच्या प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. याअंतर्गत भारताच्या सागरी व्यापारावर तसेच भारतीय खलाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने संवेदनशील ठरलेल्या पश्चिम आशिया आणि काळा समुद्र प्रदेशातील संघर्षांशी संबंधित मुद्यांचाही समावेश होता. या संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच मार्ग असून, शांततेच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी भारत तयार असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी पुन्हा एकदा अधोरेखीत केले.
दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी परस्परांमध्ये सातत्यपूर्ण संवाद सुरु ठेवण्यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. सध्याच्या जागतिक राजनैतिक अनिश्चिततेच्या काळातही ही भागिदारी सातत्याने विकसित होत गेली असून तिने लवचिकतेचाही प्रत्यय दिला आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांना 24 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे निमंत्रण स्विकारले. या शिखर परिषदेच्या तारखा राजनैतिक संवादाच्या माध्यमातून परस्परांच्या सोयीनुसार निश्चित केल्या जाणार आहेत.
***
निलिमा चितळे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Delighted to meet President Putin in Delhi, less than two weeks after our meeting in Bishkek.
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2026
During today’s meeting we talked about:
Closer trade ties, including implementation of the Programme for Economic Cooperation 2030.
Cooperation in areas like infrastructure, energy,… pic.twitter.com/nLaMDxnDEc
Presented President Putin with a Russian translation of the Thirukkural, which carries the eternal wisdom of the great Thiruvalluvar across languages and borders. pic.twitter.com/rvk3rRDnvg
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2026
ரஷ்ய அதிபர் புதினுக்கு தெய்வப்புலவர் திருவள்ளுவரின் திருக்குறள் ரஷ்ய மொழிபெயர்ப்பு பிரதியை பரிசளித்தேன். திருக்குறள் தேச எல்லைகள், மொழிகளைக் கடந்த திருவள்ளுவரின் அளப்பரிய ஞானத்தைப் பறைசாற்றுகிறது. pic.twitter.com/7bNWMcMTH7
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2026