Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2011 मध्ये स्वाक्षऱ्या झालेल्या तसेच आय सी ए आय आणि संयुक्त अरब अमिरातीतल्या हायर कॉलेजेस ऑफ टेक्नोलॉजी यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजूरी


केंद्रीय मंत्रिमंडळाने, 2011 मध्ये स्वाक्षऱ्या झालेल्या सामंजस्य कराराला पूर्वलक्षी प्रभावाने तसेच आय सी ए आय आणि संयुक्त अरब अमिरातीतल्या हायर कॉलेजेस ऑफ टेक्नोलॉजी यांच्यातल्या सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाला मान्यता दिली आहे.

आय सी ए आय, एचसीटी अर्थात, हायर कॉलेजेस ऑफ टेक्नोलॉजीला त्यांच्या सध्याच्या अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन तांत्रिक साहाय्य पुरवेल, आय सी ए आयचे सदस्यत्व घेण्याच्या दृष्टीने एचसीटी विद्यार्थ्यांना नव्या अथवा सुधारित अभ्यासक्रमाची शिफारस करेल, एचसीटी विद्यार्थ्यांसाठी आयसीएआय चर्चासत्र आणि कार्यशाळा घेण्यासाठी सहकार्य करेल.

N.Sapre/N.Chitale/Anagha