पीएम्इंडिया
2014 च्या तुकडीतील भारतीय पोलिस सेवेतील 100 हून अधिक प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 7 रेसकोर्स या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांचा गणवेश हा शक्तिचे प्रतिक आहे आणि त्यांनी याची काळजी घ्यावी, या शक्तीचा वापर सर्वसामान्य नागरिकांना सशक्त करण्यासाठी केला जाईल. देशासाठी कार्य करण्याची अमूल्य संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे आणि देशासाठी काम करताना त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड करु नका असे पंतप्रधानांनी सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल देखील यावेळी उपस्थित होते.
S.Mhatre/S.Tupe/N.Sapre
Told young IPS officer trainees of 2014 batch- the uniform gives you the power to empower lives of common citizens. https://t.co/Jihv6oRIkj
— Narendra Modi (@narendramodi) November 18, 2015