Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2020, 2024 आणि 2028च्या ऑलिम्पिकसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी कृती दल स्थापनेची पंतप्रधानांकडून घोषणा


2020, 2024 आणि 2028 या येत्या तीन ऑलिम्पिकमधे भारतीय क्रीडापटूंच्या प्रभावी कामगिरीसाठी सर्वंकष कृती आराखडा तयार करण्यासाठी कृती दल स्थापन करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले. येत्या काही दिवसात हे कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

क्रीडा सुविधा, प्रशिक्षण, निवड प्रक्रिया आणि इतर संबंधित बाबींसाठी हे कृती दल धोरण तयार करेल.

देशातल्या तसेच परदेशातल्या तज्ञांचा या कृती दलात समावेश राहील.

ST/NC/DR