पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 28 मे 2026
व्हिएतनाममधील दा नांग इथल्या 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.
भारताच्या पुरुषांच्या फ्रीस्टाईल आणि महिलांच्या कुस्ती संघाने या अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती संघाने 4 सुवर्णपदकांसह 9 पदके जिंकली असून, 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात एकूण पदकसंख्येच्या बाबतीत भारताची ही आत्तापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
महिला कुस्ती संघाने देखील 6 सुवर्णपदकांसह 10 पदके जिंकली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
ग्रीको-रोमन संघाने देखील 8 पदकांसह आत्तापर्यंतची आपली सर्वोच्च कामगिरी नोंदवल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला आहे.
या यशाबद्दल त्यांनी कुस्तीपटूंचे अभिनंदन केले, तसेच त्यांना भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश
आपल्या कुस्तीपटूंची उत्कृष्ट कामगिरी!
व्हिएतनाममधील दा नांग इथे पार पडलेल्या 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये आपल्या पुरुषांच्या फ्रीस्टाईल आणि महिलांच्या कुस्ती संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.
पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती संघाने 4 सुवर्णपदकांसह 9 पदके पटकावली असून, 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात एकूण पदकसंख्येच्या बाबतीत भारताची ही आत्तापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. महिला कुस्ती संघानेही 6 सुवर्णपदकांसह 10 पदके जिंकली. ग्रीको रोमन संघाने देखील 8 पदकांसह एकूण पदकसंख्येच्या बाबतीत आपली आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी नोंदवली.
आपल्या कुस्तीपटूंचे अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.
An outstanding performance by our wrestlers!
Our Men’s Freestyle and Women’s Wrestling teams won the Team Titles at the 2026 U23 Asian Championships in Da Nang, Vietnam.
The Men’s Freestyle Wrestling team secured 9 medals, including 4 Golds, thus registering India’s… pic.twitter.com/41PruCuk1U
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2026
* * *
निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
An outstanding performance by our wrestlers!
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2026
Our Men’s Freestyle and Women’s Wrestling teams won the Team Titles at the 2026 U23 Asian Championships in Da Nang, Vietnam.
The Men’s Freestyle Wrestling team secured 9 medals, including 4 Golds, thus registering India’s… pic.twitter.com/41PruCuk1U