Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

70 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधित केले

70 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त   पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधित केले


70 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतपधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून भाषण केले.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्याग केलेल्या महात्मा गांधी, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरु आणि असंख्य लोकांना पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली.

आता 125 कोटी भारतीयांनी स्वराज्याकडून सुराज्याकडे वाटचाल पूर्ण करण्यासाठी निश्चिय केला आहे असे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. सुराज्य प्राप्तीसाठी त्याग, परिश्रम, शिस्त, ध्येय आणि चिकाटी यांची आवश्यकता असून या उद्दिष्टासाठी पंचायतपासून संसदेपर्यंत प्रत्येक संस्थांनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

पूर्वी एक काळ असा होता की सरकार आरोपांनी वेढले गेले होते, आता ही परिस्थिती बदलली असून सरकार अपेक्षांनी घेरले गेले आहे. जेव्हा अशा अपेक्षा निर्माण करतात, तेव्हा त्यामुळे आम्हाला सुराज्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करण्यासाठी ताकद मिळते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

आपल्या सरकारने केलेल्या कामांवर लक्ष केंद्रित न करता सरकारच्या कार्यपध्दतीवर लक्ष केंद्रीत करण्याची इच्छा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

संवेदनशीलता जबाबदारी, उत्तरदायित्व, पारदर्शकता, कार्यक्षमता, सुप्रशासन या सुराज्याच्या विविध वैशिष्ट्यांची पंतप्रधानांनी माहिती दिली. प्रमुख रुग्णालयातील ऑनलाईन नोंदणी, आयकर परताव्याची तत्परता, पासपोर्ट प्रक्रियेतील गती, गतिमान कंपनी नोंदणी, तसेच सरकारी सेवेतील “क” आणि “ड” श्रेणीतील पदांसाठी मुलाखत प्रक्रिया बंद करणे आदी उदाहरणांचा दाखला देत पंतप्रधानांनी केंद्र सरकारमधील कार्याचा सुराजाची वैशिष्ट्ये स्पष्ट केली.

प्रशासनाच्या प्रमुख क्षेत्रातील कामातील गतीचा वेग वाढल्याचाही उल्लेख करत त्यासाठी पंतप्रधानांनी ग्रामीण रस्ते बांधकाम, नवीकरणीय ऊर्जानिर्मिती क्षमता, पारेषण वाहिन्यांचे भूमीपूजन आणि स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी आदींचा संदर्भ दिला.

विशिष्ट क्षेत्रातील कामाचा आढावा देताना पंतप्रधानांनी जनधन योजनेअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या 21 कोटी बँक खाती, ग्रामीण भागात बांधण्यात आलेल्या 2 कोटी स्वच्छतागृहे, आणि 10 हजार गावांचे कर विद्युतीकरण आदी गोष्टींचा उल्लेख केला.

सामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्यासाठी एलईडी बल्बच्या वापरामुळे वीजेची मोठी बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सलग दोन दुष्काळनंतरही पुरेशा अन्नधान्य उत्पादनाबाबत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. यावर्षी डाळींच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सलग दोन दुष्काळानंतरही पुरेशा अन्नधान्य उत्पादनाबाबत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले. यावर्षी डाळींच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाल्याचे ते म्हणाले. मृद्रा आरोग्यपत्रिका सिंचन, सौरपंप, बियाणे, खते आणि पीक वीमा यांचा समावेश असलेल्या कृषी क्षेत्राबद्दलचा सरकारचा दृष्टिकोन पंतप्रधानांनी विशद केला.

राष्ट्रीय ओळख निर्माण करणे यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सुधारणा (रिफॉर्म), सादरीकरण (परफॉर्म), बदल (ट्रान्सफॉर्म) हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.

प्रलंबित प्रकल्प पूर्ण तसेच महत्वाच्या क्षेत्रांमधील प्रकल्प मंजूरीसाठी लागणारा वेळ कमी करणे यासाठी आपले सरकार करत असलेल्या कामाची पंतप्रधानांनी सविस्तर माहिती दिली.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी चुकती करणे, नवीन एलपीजी जोडणी, एअर इंडिया आणि बीएसएनएल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी नोंदवलेला कार्यात्मक नफा आदींचा दाखला देत पंतप्रधानांनी सरकारमधील कार्यक्षमता स्पष्ट केली. पारदर्शकतेवर भर देत पंतप्रधान म्हणाले की लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले आहे. प्रशासनाच्या प्रमुख क्षेत्रातील प्रगतीची आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने घेतलेली दखल पंतप्रधानांनी यावेळी नमूद केली.

महिलांच्या कल्याणाकरता सरकारने एकात्मिक दृष्टीकोन बाळगला असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यासाठी बेटी बचाओ-बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला योजनांच्या माध्यमातून महिलांच्या शारिरिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणाची खात्री दिली जात आहे. यासंदर्भातील सरकारच्या इतर विविध उपक्रमांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

सामाजिक एकतेचा संदेश देताना पंतप्रधान म्हणाले की, रामानुचार्य, महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या शांतता, एकता आणि बंधुभावाच्या संदेशाने प्रत्येक भारतीयाने बद्ध असले पाहिजे.

सरकारच्या वतीने राबवले जाणारे विविध उपक्रम आणि कार्यक्रम युवकांच्या रोजगार निर्मितीत योगदान देत आहे. आदर्श दुकाने आणि आस्थापना कायद्यामुळे सर्व दिवस दुकाने सुरु राहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

वन रँक, वन पेंशन, नेताजींसंदर्भातल्या फाईल्स खुल्या करणे, बांगलादेशबरोबर भूखंड सीमा करार, आदींचा दाखला देत सरकार ठामपणे प्रमुख निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले.

दहशतवाद्यांचा शहीद म्हणून उल्लेख करणाऱ्यांचा पंतप्रधानांनी तीव्र शब्दात निषेध केला. भारताचा मानवतावादी दृष्टीकोन आणि दहशतवादी कारवायांचा निषेध संपूर्ण जग मान्य करेल, असे पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे समान ध्येय जनतेने निश्चित करावे असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

यावेळी पंतप्रधानांनी काही नवीन उपक्रम जाहीर केले. स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन 25 हजार रुपयांवरुन प्रति महिना 30 हजार रुपये करण्यात आले आहे. देशभरात आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ संग्रहालय आणि स्मारकांची उभारणी करण्यात येणार आहे. गरीबांच्या रुग्णालयाच्या खर्चासाठी एक लाख रुपयांपर्यंतचा भार सरकार उचणार असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी जाहीर केले.

N. Sapre/S. Tupe/ D. Rane