पीएम्इंडिया
तीन वेगवेगळे प्रश्न तीन वेगवेगळ्या पद्धतींनी समोर आले आहेत.सर्वात आधी मी MyGov चा सक्रीय पद्धतीने वापर करण्यासाठी सर्व देशवासीयांचे आणि तुमचे मनापासून आभार मानतो. एकदा मतदान करा आणि पुढील पाच वर्षासाठी त्यांना कंत्राट द्यायचे आणि त्यांना सांगायचे की सर्व समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी तुमची आहे आपल्या देशात हा आहे. लोकशाहीचा अर्थ. या पाच वर्षांमध्ये जर काही उणीव राहिली तर मतदेवून दुसरा कंत्राटदार शोधायचा आणि त्याला सांगायचे की, त्याने काम केले नाही आता तू कर. केवळ मत देवून सरकार निवडणे इथपर्यंतच जर लोकशाही सीमित असेल तर लोकशाहीचे चैतन्य कधीच सळसळणार नाही. आणि म्हणूनच भारतासारख्या विशाल देशामध्ये सह्भागात्मक लोकशाहीची आवशक्यता आहे आणि तंत्रज्ञानामुळे ते सहज शक्य झाले आहे.
सध्या सुरु असलेले स्वच्छ भारत अभियान लोकसहभागाचे उत्तम उदाहरण आहे. सर्व लोकं, संघटना, नेते काही ना काही तरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमचा प्रश्न होता सुप्रशासानाबाबत, आपल्या देशात असा समज आहे, की सुप्रशासन म्हणजे वाईट राजकारण. हे बऱ्याच अंशी सत्य आहे. अधिकांश वेळा राजकारणामध्ये, निवडणुक जिंकल्या नंतर सरकारांचे लक्ष पुढील निवडणूक कशाप्रकारे जिंकता येतील यावर असते. आणि ते अशाच योजनांना प्राधान्य देतात ज्याआधारे जनाधार वाढेल आणि अधिकाधिक मत मिळण्याचे मार्ग शोधले जातात आणि जेव्हा हाच उद्देश समोर ठेवून जेव्हा प्रवास सुरु होतो तेव्हा काही पावले चालल्यानंतर डगमगायला सुरुवात होते.
तुम्ही जो विचार केलात निर्णय घेवून निधी उभारला तो जर लाभार्थ्यापर्यंत पोहोचला नाही, तुम्ही जी योजना तयार केली आहे त्याचा लाभ मिळत नसेल तर काही दिवसांपर्यंत तुमचे कौतुक होईल की, सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. संपादकीय देखील लिहिले जाईल ठळक बातमी देखील बनेल परंतु जर आपण सुप्रशासनावर जोर नाही दिला तर सामान्य मनुष्याच्या जीवनात बदल नाही घडणार. असा विचार करा की, सरकारी तिजोरीतील पैसे खर्च करून एक मोठे रुग्णालय उभारण्यात आले रुग्णालायची इमारत प्रशस्थ आहे तिथे सर्वोत्तम उपकरणे बसवली जातील तंत्रज्ञानाच वापर केला जाईल. परंतु तिथे येणाऱ्या रुग्णाला या सर्वांचा लाभाच मिळत नसेल, त्याला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत खेपा घालाव्या लागत असतील. आणीबाणीमध्ये रुग्ण आला आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही मग इतका विकास करून, इतके पैसे खर्च करून इतके सुसज्ज रुग्णालय उभारल्यानंतरही सुप्रशासनाच्या अभावामुळे अब्जावधी रुपयांची हि बर्बादी आहे. आणि म्हणूनच विकास व सुप्रशासन या दोहोंमध्ये ताळमेळ असला पाहिजे तेव्हाच या सर्वाचा सामान्य माणसाला लाभ होईल.
आपल्या देशात सुप्रशान हे एक दुर्भाग्य आहे. काही विचारवंत, एखाद्या पंचायती मध्ये काही घडले की, त्याबाबत पंतप्रधानांना विचारणा करणार, नगरपंचायतीत काही घडले तर पंतप्रधानांना विचारणार, जिल्हापरिषदेत काही झाले तर त्याचे उत्तर पंतप्रधानांकडे मागणार, नगरपालिकेमध्ये गेलो तरी देखील पंतप्रधानांनी उत्तर दयावे, महानगरपालिकेत काही घडले त्याचे उत्तर देखील पंतप्रधानांनी दयावे, राज्यात काही घडले तर त्याचे देखील उत्तर पंतप्रधानांनी दयावे, राजकीय दृष्ट्या हे ठीक आहे टी आर पी साठी देखील कदाचित हे ठीक असेल. या सर्वाचा पंतप्रधानांना त्रास होतो हि काही चुकीची गोष्ट नाही लोकशाही मध्ये हे झालेच पाहिजे आणि माझ्या सारख्याला तर जास्त त्रास झाला पाहिजे परंतु त्याचे दुष्परिणाम असे होतात की, पंचायतीला आपली जबाबदारी कळतच नाही, नगरपालिकेला वाटते हि माझी जबाबदारी नाही, महानगरपालिकेला वाटते माझी नाही, राज्यांना वाटते माझी जबाबदारी नाही आणि यामुळे प्रशासनाचे खूप मोठे नुकसान होते.
सुप्रशासनामध्ये पहिली आवश्यक बाब म्हणजे ज्याची जी जबाबदारी आहे त्याच्याकडे त्या जबाबदारीचा हिशोब मागितला जावा, ना त्याच्या खालच्या माणसाकडे ना त्याच्या वरच्या माणसाकडे थेट संबंधित व्यक्तीकडे त्याची विचारणा केली जावी तेव्हाच सुधारणा होईल, आणि त्याचकरिता सुप्रशासन आणि लोकजागृती आणि विचारवंतांची आवश्यकता आहे. ज्याची जबाबदारी आहे तोच त्यासाठी उत्तरदायी असेल हे बंधनकारक असेल. सुप्रशासानाबाबत माझे दुसरे मत असे आहे की, कधीकधी समस्यांच्या मुळाशी सरकार स्वतःच असते. मला हे माहित आहे की मी हे जे बोलत आहे त्यामुळे काय काय झाले आहे. सरकार जितके अलिप्त राहील जनता तेवढीच सामर्थ्यवान होईल आणि देशाला ज्याची गरज आहे ते ती देऊ शकते. सरकारला प्रत्येक ठिकाणी मध्ये यायची गरज नाही. परंतु इंग्रजांच्या काळापासून ही सवय लागली आहे त्याला बदलणे कठीण काम आहे. असे असले तरीही सुप्रशासानासाठी बदल आवश्यक आहे. अडथळे निर्माण करणे, लोकांना वारंवार आपल्याकडे यावे लागणे अशी परिस्थिती का असावी?
आता ही साधीच गोष्ट बघा, झेरॉक्सचा जमाना आला तंत्रज्ञान आले परंतु असे असले तरीही आम्ही प्रशस्तीपत्रे साक्षांकीत करण्याचा आग्रह धरत होतो. त्यासाठी आपण उमेदवाराला नगरसेवकाची स्वाक्षरी घेऊन ये, आमदाराची स्वाक्षरी घेऊन ये, खासदाराची स्वाक्षरी घेऊन ये, जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन ये असे सांगायचो आणि तो बिचारा स्वाक्षरी घेण्यासाठी फिरत बसायचा. आम्ही सत्तेत आल्यानंतर निर्णय घेतला की जनतेवर विश्वास ठेवा. झेरॉक्स मशीन झेरॉक्स करून देते. जेव्हा त्या उमेदवाराला नोकरी मिळण्याचे निश्चित होईल तेव्हा मूळ प्रशस्तीपत्रे तपासावीत. सुप्रशासानामध्ये कार्य पद्धती कमी असावी, सामान्य नागरिकांना सुलभतेने कोणतीही बाब समजावी, आम्ही अशी पद्धती विकसित करण्याच्या बाजूने आहोत.
राज्यांचा, महानगरपालिकांचा जेवढा थेट संबंध नागरिकांशी येतो तितका केंद्र सरकारचा येत नाही हे मान्य आहे तरीही आम्ही व्यापार सुलभीकरण अभियान सुरु केले. राज्यांमध्ये स्पर्धा सुरु केली, हे सर्व परवान्यांचे जाळे कमी करायला सांगितले त्यांना समजावले आणि मला आनंद वाटतो की, देशातील अशी अनेक राज्ये ज्यांच्याकडे आपण कधीच विकसित राज्य म्हणून पहिले नव्हते त्यांनी पुढाकार घेतला, चांगल्या राज्यांनी पुढाकार घेतला आणि अनेक कार्य पद्धती छोट्या, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित केल्या.सुप्रशासानाचा अनुभव यायला लागला.
आता जशी आपण इनाम नावाची योजना तयार केली आहे ईमण्डी. आतापर्यंत शेतकऱ्याने किती रुपयाला आपला माल विकावा हे कोणी दुसरे ठरवायचे परंतु आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी स्वत: ठरवेल कि, त्याला त्याचे कृषी उत्पन कुठे विकायचे आहे, कोणत्या किमंतीला विकायचे आहे. यामुळे शेतकऱ्याचा फायदा होईल आणि याचकरिता सुप्रशासानाची आवश्यकता आहे.
तक्रार निवारण प्रणाली ही लोकशाही मधील दुसरी सर्वात मोठी ताकत आहे असे मी मानतो. सरकार जनतेचा आवाज ऐकते का, जर ऐकत असेल तर जबाबदारीने त्याला उत्तर देते का, आपल्या सुप्रशासानाची ही गरज आहे आणि अजून बरेच कार्य बाकी आहे. सामान्यामधील सामान्य नागरिकाची तक्रार ऐकण्याची सर्वोत्तम व्यवस्था असावी आणि निर्धारित वेळेत त्याचे निवारण झाले पाहिजे. त्याला जर काही समस्या असेल तर सरकारी व्यवस्थेने त्याच्याकडे मदतीचा हाथ पुढे केला पाहिजे त्याचा आवाज दाबला नाही पाहिजे.
सुप्रशासनाच्या दृष्टीने आम्ही या दिशेने काम करीत आहोत. मी सध्या दर महिन्याला एक प्रगती कार्यक्रम आयोजित करतो यामध्ये सर्व सचिव, सर्व राज्यांचे प्रधान सचिव या बैठकीला उपस्थित असतात. जनतेच्या त्या तक्रारी माझ्या पर्यंत येतात त्या मी थेट त्या सर्वांसमोर मांडतो, मुद्दा एक असतो परंतु मी सर्व व्यवस्थेला संबोधित करतो. कोणी जर निवृत्ती वेतानासंदर्भात तक्रार केली असेल तर मी निवृत्ती वेताना संदर्भातली जेवढी प्रकरणे आहेत त्या सर्वांबाबत विचारणा करतो आणि त्यांच्या निवारणावर जोर देतो, त्या तक्रारींचे निवारण का नाही झाले, कशाप्रकारे केले जाईल, किती वेळ लागेल या सर्वाची विचारणा करतो. सुप्रशासानासाठी आम्ही काही उपक्रम राबवत आहोत आणि मला विश्वास आहे की आपल्या अनेक समस्यांचे निवारण हे सुप्रसासानामुळेच झाले आहे.
दुसरा प्रश्न एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने विचारला होता आणि त्यांचा प्रश्न होता की, भारत आज जगात सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. हि गोष्ट खरी आहे की, मोठ्या देशांमध्ये भारत आज सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे आणि केवळ आमचाच विकास होत आहे असे नाही. आपल्या देशात लागोपाठ दोन भयंकर दुष्काळ पडले. आपल्या देशात कृषी अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी भूमिका आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लागोपाठ दोन भयंकर दुष्काळ पडणे हे किती मोठे संकट आहे हे आपण समजू शकतो. दुसरे म्हणजे जगभरात मंदीची लाट आहे.
संपूर्ण जगाची खरेदी क्षमतेमध्ये खूपच घसरण झाली आहे. जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेची ही परिस्थिती आहे, भारतामध्ये कृषी क्षेत्रावर इतका दबाव आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये देशाचा विकास दर ७.५ टक्क्यांहून अधिक आहे यासाठी मी सव्वा करोड देशवासीयांचे अभिनंदन करतो, त्यांना नमन करतो. हा त्यांच्या पुरुषार्थाचा परिणाम आहे की देश इतक्या वेगाने प्रगती करत आहे.
आणि आता प्रश्न हा आहे की या आर्थिक विकासाच्या बदलामुळे काय काय घडते. आपण हे जाणतो की, आपल्या कुटुंबात जर एक व्यक्ति कमावत असेल आणि महिन्याला २० हजार रुपये घरात येत असतील तर आपण त्या २० हजारात घर चालवताना प्राधान्यक्रम ठरवतो, काय आणायचे आहे, काय नाही, किती खायचे आहे, किती नाही, भाजी आणायची आहे की नाही, दुध आणायचे आहे की नाही, मुलांसाठी नवीन कपडे आणायचे आहेत की नाही या सर्व गोष्टींचा आपण विचार करतो.
परंतु कुटुंबात अजून एका व्यक्तीला रोजगार मिळाला आणि १० हजार रुपयाचे अधिक उत्पन घरात येवू लागले तर आपल्या अर्थव्यवस्थेची गणिते बदलतात. ज्याप्रकारे कुटुंबाचे आहे तसेच देशाचे आहे.
जर देशाच्या तिजोरीत जास्त पैसे असतील तर विकास काम जास्त होतील, विकासाची कामे जास्त झाली तर अधिक लोकांना रोजगार मिळेल. जर जास्त पैसे असतील तर चांगले रस्ते बांधले जातील, दूरवर रस्ते निर्मिती होईल तर रस्ते निर्मितीच्या कामामध्ये लोकांना रोजगार मिळेल. या लोकांना रोजगार मिळाला तर तो चप्पल खरेदी करेल, पूर्वी तो एकवेळ जेवायचा आता दोन्ही वेळ जेवेल. त्याच्याकडे पैसे आले तर तो खर्च करेल. खर्च केल्यानंतर पैसा परत बाजारात येईल तर तो अर्थव्यवस्थेला चालना देईल. हे एक सुलभ अर्थकारण आहे. यासाठी कोणत्या धोरणाची गरज नाही.
काही नियम, काही व्यवस्था या सर्वांवर जोर दयावे लागते परंतु आपण आपल्या नैसर्गिक स्रोतांचा जेवढा अधिक वापर करू तेव्हढा आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होईल. आपण मनुष्यबळाचा देखील योग्य वापर करायला हवा. आपल्या देशात वय वर्षे ३५ च्या खाली ८०० दशलक्ष युवा वर्ग आहे. आपण या सर्वांची क्षमता ओळखून त्याचा उपयोग करून घेतला तर अर्थव्यवस्थेचा विकास होईल.
भारतासारख्या देशाकडे हजारो वर्ष जुनी परंपरा आहे. जर आपण पर्यटनाचा विकास केला, यशस्वीरीत्या विकास केला तर जगभरातले पर्यटक इथे येतील. आणि ही जी आपली हजारो वर्ष जुनी परंपरा आपल्याकडे आहे त्याचे रुपांतर अर्थव्यवस्थेत होईल. आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होईल म्हणून ताजमहाल मध्ये कोणी गुंतवणूक केली होती का?
त्यावेळी जर वर्तमानपत्रे असती तर संपादकीय देखील आले असते की लोकांची उपासमार होत असताना ताजमहालची निर्मिती होत आहे. त्यावेळी जर दूरदर्शन वाहिन्या असत्या तर मजदूरांचे कशाप्रकारे हाल होत आहेत हे दाखवले असते. परंतु तोच ताजमहाल आज लाखो लोकांच्या रोजागाराचे साधन बनला आहे. म्हणूनच आपण कुठच्या गोष्टीचा कशाप्रकारे वापर करतो यावर ठरवले जाते की अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळेल. आणि देशासाठी हे आवश्यक आहे.
जास्त नाही मित्रांनो, फक्त ३० वर्ष जर आपण ८ टक्क्यांहून अधिक विकास दर गाठू शकलो तर आज जगामध्ये जे काही उत्तम आहे ते सर्व तुमच्या पायापाशी असेल. हे भारतात घडू शकते आणि आपल्या सर्वांचे हे लक्ष्य असले पाहिजे. शेतकरी आहात तरी देखील, जर तुमच्याकडे २ एकर जमीन आहे तर कदाचित ती अडीच एकर होणार नाही परंतु त्या २ एकर जमिनीमध्ये मी अधिकाधिक उत्पन्न कशाप्रकारे घेऊ शकतो यावर जोर दिला तर मी विकासाला बळ प्रदान करू शकतो.
दुसरे म्हणजे भारतामध्ये जितके निर्माणकर्ते आहेत त्यांनी जास्तीत जास्त जागतिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जेव्हा भारतात तयार झालेली मेट्रो ऑस्ट्रेलिया मध्ये निर्यात केली जाते. भारतात तयार झालेली जपानी कंपनी मारुती जेव्हा भारतात कार निर्माण करते आणि जपान त्याला निर्यात करतो तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होतो.
आज आपण अब्जावधी रुपयांचे पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. आपण जर सौर उर्जेवर लक्ष केंद्रित केले तर आपण आपल्याच ताकतीच्या जोरावर आयात कमी करू शकतो आणि विकासामध्ये एक नवीन अध्याय जोडू शकतो. अब्जावधी रुपयांची संरक्षण सामुग्री आपण आयात करतो. भारतातील युवकांकडे प्रतिभा आहे.
जर आपण संरक्षण सामुग्री निर्मितीसाठी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केली, थेट परकीय गुंतवणूक आली तर इथल्या युवकांना रोजगार मिळेल आणि आपल्याला आयात करायची गरज भासणार नाही. आणि या सर्वात जर आपण यशस्वी झालो तर भारत आपोआपच सुरक्षित होईल आणि आपला आर्थिक विकास वेगाने होईल त्यात कोणतेही चढ उतार नसतील.
३० वर्ष…आज जे काही जगात सर्वोत्तम आहे ते सर्व तुम्ही तुमच्या डोळ्यांनी भारताच्या भूमीवर पाहू शकाल. हा माझा विश्वास आहे.
तिसरा प्रश्न एका बाईसाहेबांनी आरोग्यसेवा क्षेत्राविषयी विचारला होता. त्यांची काळजी स्वाभाविक आहे, आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत की ‘आरोग्यं धनसंपदा’ परंतु आपण हे बघितलं आहे की, जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा आपण खाण्याचा आग्रह करतो आणि आहाराविषयी चर्चा करतो. अनेकदा तुमच्या हे लक्षात आले असेल की, आरोग्याचे देखील असेच आहे. प्रत्येकजण दुसऱ्याला सल्ला देतो परंतु स्वतः मात्र त्या गोष्टीचे पालन करत नाही. तो दुसऱ्याला सांगतो की चाळीशी पार केली ना आता दरवर्षी नियमित वैद्यकीय तपासणी करत जा. नंतर त्याला विचार त्याचे वय किती, माझे वय ४७, तुम्ही किती वेळा तपासणी केली,एकदाही नाही.
काय कारण असेल की, कोणे एके काळी आपल्या प्रत्येक गावात एक वैद्यराज असायचा आणि तेव्हा संपूर्ण गाव निरोगी असायचे. आज डोळ्यांसाठी वेगळा डॉक्टर आहे, कानासाठी वेगळा डॉक्टर आहे, पायासाठी वेगळा डॉक्टर आहे, हातासाठी वेगळा डॉक्टर आहे, डोक्यासाठी वेगळा डॉक्टर आहे, परंतु आजार वाढत आहेत. याचाच अर्थ असा आहे की, आपण प्रतिबंधात्मक आरोग्य सुरक्षेविषयी उदासीन आहोत. प्रतिबंधात्मक आरोग्य सुरक्षेवर आपल्याला जोर द्यायला पाहिजे. डॉक्टरची गरजच भासणार नाही याकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे.
सामान्य मनुष्याचा अधिकार असलेले स्वच्छ पेयजल पुरवण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तर आजारांसंबंधित अनेक समस्या दूर व्हायला तिथूनच सुरवात होईल. मला माहित आहे की हे काम कठीण आहे पण कोणी तरी याचा विचार करायला हवा. मी स्वच्छता अभियानाचा आग्रह धरला आहे.
स्वच्छता अभियान एक प्रकारे आजारांविरुद्धची लढाई आहे आणि गरिबांना मदत करण्याचा सर्वात मोठा उपक्रम. जागतिक बँकेचे असे म्हणणे आहे की, जर एका गरीब कुटुंबात आजार येतो तर त्या गरीब कुटुंबाचे अंदाजे ७ हजार रुपये त्या आजारामध्ये खर्च होतात. जर एखादा रिक्षा चालक आजारी पडला तर ३ दिवस त्याची रिक्षा बंद राहते आणि ३ दिवस त्याचे कुटुंब उपाशी राहते. आणि म्हणूनच जेव्हा आपण आरोग्य विषयी चर्चा करतो तेव्हा आपण सामान्य मनुष्याच्या जीवनात काय करू शकतो यावर जर आपण जोर दिला तर खऱ्या अर्थाने आरोग्य क्षेत्रात बदल घडू शकतील. प्रतिबंधात्मक आरोग्य सुरक्षेवर आपल्याला जोर द्यायला पाहिजे. मग ते योग असो, खाण्यापिण्याची सवय असो, दुसरी परवडणारी आरोग्य सेवा असो.
आज तुम्ही बघत आहात की, भारतात किडनी संबंधित समस्या किती फोफावत आहेत, आम्ही शेकडो डायलिसिस केंद्र सुरु केली तरी हे सांगणे कठीण आहे की त्या केंद्रांसमोरची रांग कमी होईल की नाही हे सांगू शकत नाही. मागील अर्थसंकल्पामध्ये आम्ही सार्वजनिक खाजगी भागीदारी मध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये खोली द्यायची घोषणा केली होती, तुम्ही या, गुंतवणूक करा, डायलिसिस केंद्र चालवा.
सामान्य माणूस कुठे जाणार आणि असे नाही की हे आजार केवळ श्रीमंतानाच होतात. सामान्य मनुष्याला देखील होतात त्यांच्यासाठी आपण कसे काम करणार. आपल्या देशात अब्जावधी रुपये जाहिरातींवर खर्च केले जातात. लसीकरणासाठी सरकार खर्च करते. निधीची कमतरता नाही, अधिकारी काम करतात, आई वडिलांना जागरूक करण्याचे प्रयत्न केले जातात, टी व्ही वर जाहिरात, वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली जाते.
इतके सर्व प्रयत्न करून देखील लाखो मुले निदर्शनास आली ज्यांचे लसीकरण झाले नव्हते. आम्हाला हे माहित आहे की, लसीकरण मुलांच्या आरोग्याकरिता आणि भविष्यासाठी खूप उपयुक्त आहे. परंतु उदासीनता आहे, परंतु उच्चभ्रू घरातील लोकांना असे रांगेत उभे रहायला लाज वाटते. आम्ही असे रांगेत का उभे रहावे असे म्हणत त्यांच्या मुलांचे लसीकरण राहून जाते आणि गरीब कुटुंबाचे आज कामावर जायचे आहे पुढच्या वेळी जाऊ असे म्हणून मुलांचे लसीकरण राहून जाते.
आम्ही संपूर्ण देशात या योजने अंतर्गत एक अभियान चालविले की किती मुले लसीकरणापासून वंचित राहिली आहेत आणि लाखोंमध्ये हा आकडा समोर आला. सरकारने सर्व सुविधा देवून देखील त्यांनी त्याचा फायदा घेतला नाही. आता घरोघरी जाऊन लसीकरणाचे काम सुरु आहे. आरोग्य विभाग जलद गतीने हे काम करीत आहे.
आरोग्य क्षेत्रात आम्ही एक विमा पोलिसीचा समावेश करत आहोत. आगामी काही दिवसांमध्ये त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल. अर्थसंकल्पात आम्ही याचा उल्लेख केला होता. जेणेकरून आपल्या देशातील गरीबातील गरीब व्यक्ति आरोग्याची काळजी घेईल. आम्ही त्या दिशेने कार्य करत आहोत आणि त्याचा लाभ होईल असे मला वाटते.
उद्या ७ ऑगस्ट आहे…..हातमाग दिन. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली परदेशी कपडयांची होळी आणि स्वदेशीचा मंत्र दिला गेला. याच्यासोबत अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच गेल्यावर्षी पासून ७ ऑगस्ट हा दिवस आम्ही हातमाग दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे. आपल्या देशात कृषी क्षेत्रानंतर गरीबातील गरीब व्यक्तीला रोजगार देण्याची ताकद जर कोणत्या क्षेत्रात असेल तर ते आहे वस्त्रोद्योग, हातमाग, खादी, विणकाम. सव्वाशे कोटी नागरिकांनी असा निश्चय करावा की, मी कपड्यांवर जो काही खर्च करेल जास्ती नाही ५ टक्के मी या उत्पादनांवर खर्च करेन. मी तुम्हाला खात्री देतो की, या गरीब व्यक्ति आहेत ज्या आधुनिक यंत्रावर नाही तर आपल्या हाताच्या कौशल्याने काम करतात त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अमुलाग्र बदल घडेल. मी प्रत्येकाला सांगतो की, २ ऑक्टोबरला काही ना काही तरी खादीचे उत्पादन खरेदी करा, आणि ते संपूर्ण महिनाभर त्यांना कमिशन देतात. गरजेचे नाही की तुम्ही फक्त खादीचाच वापर करा पण तुम्ही एखादी तरी खादीची वस्तू तुमच्या घरात तुमच्या जवळ ठेवू शकता; तुम्ही बघालच यामुळे एखाद्या गरीब व्यक्तीला सहाय्य होईल. हातमाग स्वतःहून फॅशन जगतात प्रसिद्ध होत आहे.
एक वेळ होती जेव्हा देशासाठी खादी हा मंत्र दिला जायचा; परंतु जर आपण आता फॅशनसाठी खादी असे ठरविले तर हातमाग क्षेत्राच्या विकासात अनेक संधी उपलब्ध होतील. या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या अद्यावतीकरणाचे कामदेखील सुरु आहे. फॅशन डिझायनर देखील या क्षेत्राशी जोडले जात आहेत, आणि दुसरे म्हणजे जागतिक स्तरावर लोकं सर्वांगीण आरोग्य सुविधांचा वापर करतांना दिसत आहेत आणि हे सर्व लोकं हातमाग आणि खादींच्या वस्तूंकडे आकर्षित होत आहेत. येथे आपण सर्व तंत्रज्ञानाशी निगडीत जो युवा वर्ग उपस्थित आहे आपण ई व्यासपीठाच्या सहाय्याने जागतिक बाजारहाट (मार्केटिंग) करून या गरीब लोकांनी तयार केलेल्या वस्तू जगभरात विकण्याचे अभियान राबवू शकतो; आणि आज मी पहिले की, तुम्ही येथे माझ्या हस्ते एका व्यापारी उपक्रमाचा शुभारंभ देखील केला. आणि मला नंतर आनंद झाला जेव्हा तुम्ही मला सांगितले की यातून मिळणारा नफा गंगा सफाई अभियानाकरिता वापरला जाईल; तेव्हा माझी भीती देखील थोडी कमी झाली नाहीतर लोकं म्हणाली असती मोदी आता व्यापार करायला लागला आहे. पण हा एक उत्तम उपक्रम आहे. आपण हातमाग क्षेत्र प्रसिद्धी मिळवून देऊ या; आपले गरीब विणकर जे इतकी मेहनत करत आहेत त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ या आणि मग बघता बघता आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडून येतील.
पहिला प्रश्न होता विदेश निती संदर्भातला. विदेश नितीमध्ये आक्रमक, पुरोगामी आणि स्वयंप्रेरित या शब्दांची आवश्यकता नाही. वास्तविक विदेश निती देशाच्या हितासाठीच असते. इंडिया फस्ट चा मूळ हेतू हाच आहे की इंडिया फस्ट हा उपक्रम भारताचे जे धोरणात्मक हित आहे त्याचे रक्षण करून भारताला आर्थिक दृष्ट्या समृद्ध करील, जगात सर्वदूर पसरेल. तिसरी महत्वाची बाब म्हणजे काळ बदलला आहे. संपूर्ण विश्व आता एकमेकांवर अवलंबून आहे. प्रत्येक जण एकमेकांशी जोडलेले आहोत. कोणाच्यात ५, कोणाच्यात २ गोष्टी समान आहेत, कोणी सोबत चालत आहे कोणी मागे पुढे चालत आहे; असे असले तरीही सर्वजण एकत्र आहोत. यासर्व बाबी बारकाईने समजून त्यांचा उपयोग करणे गरजेचे आहे. मला माहित आहे भारताच्या हिताची काळजी करणे हे खूप मोठे काम आहे. अजून एक दुसरा पैलू ज्याचा आपण विचार करु शकतो ते आहेत आपले अनिवासी भारतीय, संपूर्ण जगात वास्तव्य करून असलेल्या भारतीयांची स्वतःची एक ताकत आहे; जगभरात राहणाऱ्या भारतीयांचे नावलौकिक आहे, इज्जत आहे, संबंधित सरकारांमध्ये त्यांना आदराची वागणूक दिली जाते. ही आपली शक्ति आहे. जगासोबत संबंध प्रस्थापित करण्यामध्ये हे सर्व महत्वपूर्ण भूमिका बजावतात. सध्या हे सर्व अनिवासी भारतीय स्वयंप्रेरित झाले आहेत. मला वाटते भारतासाठी हे आवश्यक आहे; आणि खूप उत्तम प्रकारे भारत जगामध्ये एक नवीन उर्जेसोबत, प्रतिष्ठेसोबत आपले स्थान निर्माण करीत आहे, आणि लोकशाही मूल्यांशी निगडीत देशांमध्ये भारत आज अनेक उपक्रम राबवित आहे; ज्यामध्ये विश्व आम्हाला सहाय्य करीत आहे. त्यांनी मला तिसरा व्यैयक्तिक प्रश्न विचरला. परदेशात राहणाऱ्यांसाठी हा प्रश्न खूपच स्वाभाविक आहे कारण ते नेहमीच जेकलेसने त्रस्त असतात आणि म्हणूनच त्यांनी मला विशेषतः विचरले की तुम्ही इतका प्रवास करता, तुम्ही थकत नाही का? मला वाटते हा प्रश्न मला बरेचजण विचारतात; आणि आत्ताच नाही तर अनेक वर्षापासून लोक मला हा प्रश्न विचारत आहेत. सव्वाशे कोटी देशवासीयांची स्वप्ने, त्यांच्या परिस्थितीसोबत मी नेहमी जोडलेला राहतो आणि म्हणूनच मला नेहमी वाटते की माझ्याकडे जितका वेळ आहे, जितकी शक्ति आहे ती सर्व लोकांसाठी खर्च करू. लोकं असा विचार करतात की तुमच्यात इतकी ऊर्जा आहे म्हणून तुम्ही इतके काम करता. इतकी ऊर्जा आहे म्हणून तुम्हाला इतके काम करणे शक्य आहे हे गणित चुकीचे आहे. एकदा का तुम्हाला कळल की तुम्हाला इतके काम करायचे आहे हे माझे मिशन आहे तर ऊर्जा आपोआपच येते. देवाने प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा प्रदान केली आहे. कोणी त्या ऊर्जेचा वापर करत नाही तर कोणी त्या ऊर्जेला तेजस्वी बनविते. आपल्या सर्वांना ईश्वराने दिलेली ऊर्जा एकसमानच आहे. तुम्हाला जितकी ऊर्जा ईश्वराने दिली आहे तेव्हढीच ऊर्जा माझ्याकडे आहे. परंतु माझ्याकडील ऊर्जेचा वापर मी माझे मिशन पूर्ण करण्यासाठी वापरत आहे. या कार्यासाठी मी मार्गस्थ झालो आहे आणि माझी ऊर्जा वाढतच आहे आणि मी तिचा सदुपयोग करीत आहे. तुम्ही देखील या मंत्राचा अवलंब करा.दुसरा विषय होता पर्यटनाचा. या सरकारने जो पुढाकार घेतला आहे त्यामुळे पर्यटनात मोठ्या प्रमाणात वृद्धी झाली आहे. मागील ६ ४० लाखांहून अधिक पर्यटक भारतात आले आहेत. ई विजामुळे हे अधिक सुलभ झाले आहे. स्वच्छतेमुळे पर्यटनात वाढ होत आहे. पूर्वी देखील पर्यटक येत होते, भारत भ्रमण करत होते परंतु आपल्या देशात जाऊन इथे काहीतरी कमतरता असल्याचे सांगायचे. या काही तरी ला आम्ही मागे सोडत आहोत.तिसरी बाब आहे…..भारतातील भारताचा वारसा. जगाला या परंपरेकडे/वारश्याकडे आकर्षित करायचे आहे. आपण असे म्हणालो की, आपल्या समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटन वाढेल तर जगात आपल्यापेक्षा अधिक सुंदर समुद्र किनारे आहेत. परंतु कोणाला हे समजले की इथे ५ हजार वर्ष जुनी एखादी कलाकृती आहे, दोन हजार वर्ष प्राचीन एखादी वस्तू आहे, एक हजार वर्ष जुनी एखादी वस्तू आहे तर त्या व्यक्तीला व्यक्तीला ती संस्कृती, मानव संस्कृती पाहण्याची ओढ लागेल. जग आपल्याकडे आकर्षित होईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण भारताकडे वैविध्यपूर्ण स्वतःची खाद्यसंस्कृती आहे. आपण या गोष्टीचे योग्य मार्केटिंग केले तर आपण जगाला वेड लाऊ शकतो. जगाने एका कोपऱ्यात जो पिझ्झा हट बघितला तोच पिझ्झा हट हजारो किलोमीटर लांब दुसऱ्या एखाद्या कोपऱ्यात असतो, सगळीकडे तीच चव असते काहीच फरक नसतो. आमच्या इथे तामिळनाडूच्या एका टोकापासून सुरु होऊन दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत १० वेगवेगळ्या चवीच्या इडली मिळतात; परंतु आपण या गोष्टींकडे कधीच आपली ताकत म्हणून पाहिले नाही, ही आपली ताकत आहे. मी फॅशन डीझायनारांसोबत चर्चा करत होतो. मी विचारले, भारतात जे कपडे परिधान केले जातात त्याचा तुम्ही कधी अभ्यास केला आहे का? एखाद्या भागातील लोकं असे कपडे घालतात त्याचे काय कारण असेल? भारतात ‘ मर्यादेचा’ खूप मोठा दबाव आहे; परंतु असे असले तरीही काही समाज असे आहेत जिथे महिलांचा घागरा पायापासून अर्धाफूट वरती असतो. काय कारण असू शकेल? नाहीतर घरंदाज महिला आपल्या पायाचे नखं देखील दाखवत नाहीत; काय कारण असेल? तुम्ही या सगळ्याचा अभ्यास केला आहे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले नाही आम्ही असा अभ्यास केला नाही. तेव्हा मी म्हणालो हेच तर भारताचे वैशिष्टय आहे. जर एखादा व्यक्ति पगडी बांधत असेल तर हवामान कसे होते म्हणून तो अशी पगडी बांधायला लागला. तो जर आपल्या शरीरावर असे कपडे घालत असेल तर काय कारण असेल? देशाच्या उत्तरेकडे गेलो तर लोकं धोतर नेसतात, दक्षिणेकडे गेलो तर लोकं लुंगी बांधतात, काय कारण आहे? आपण आपल्यातील विविधतेकडे लोकांना आकर्षित करू शकतो आणि जितकी अधिकाधिक लोकं आपल्या परंपरेशी जोडली जातील तेवढा पर्यटनाच विकास होईल. आपल्यापेक्षा अधिक उत्तम आधुनिक गोष्टी जगातील इतर राज्यांच्याकडे आहेत, ज्या त्या लोकांना देवू शकतात. जे जगाकडे नाही आणि आपल्याकडे आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवे. पर्यटन हे स्वभावाशी देखील निगडीत आहे. भारतातील लोकं अतिथींचे नेहमीच स्वागत करतात. याला जेवढी आपण चालना देऊ तेवढा आपल्याला लाभ होईल. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मी एक सांगू इच्छितो की, तुम्ही भारतात डॉलरने गुंतवणूक करा किंवा नका करू; भारतात येवून एखादे सामाजिक कार्य करा अथवा नाही; परंतु जगभर पसरलेला भारतीय समाज एक काम नक्कीच करू शकतो. परदेशात तो नोकरीला जातो, तेव्हा तिथल्या नागरिकांशी त्याचा संबंध येतो. त्यांनी हा निश्चय करावा की प्रत्येक वर्षी ५ अभारतीय कुटुंबांना भारतात जाण्यासाठी प्रवृत्त करेन. हे काही फार कठीण कार्य नाही, भारत सरकारच्या पर्यटन विभागाच्या शेकडो पटीने अधिक काम हे लोकं करू शकतात.
भारतात सामाजिक कार्य करणे हे आपले संस्कार आहेत, आपला वारसा आहे. तुम्ही बघत असाल कोणतेही संकट आले की, लोकं मदत करायला धावून जातात. काही ना काही तरी करतात. भारतात समाजसेवेचे धडे दयायला लागत नाहीत. त्यासाठी कोणती शिकवणी घेतली जात नाही. ते आपल्या स्वभावातच आहे.
समस्या ही आहे की, सध्या समाजसेवेसोबत माझे ज्ञान जोडले गेले आहे. खरंच तुम्ही कल्पना करा की, बाबासाहेब आंबेडकर शिक्षा दीक्षा प्राप्त करून इतके महान व्यक्ति झाले. दलित असल्यामुळे भारतात त्यांना अनेक अपमान सहन करावे लागले होते. परदेशात त्यांच्यासाठी मान सम्मान पद प्रतिष्ठा पदवी सगळं होत; परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा सेवाभाव बघा त्यांनी ती सारी प्रलोभने दूर ठेवून अपमानित जाहले तरी भारतात काम करणे पसंद केले.
महात्मा गांधी वकील होते सर्व सोडून आले, सरदार वल्लभ भाई पटेल वकील होते चांगली कमाई करू शकत होते, शिक्षण सोडून परत आले. वीर सावरकर वकील होते खूप संधी समोर होत्या सर्व सोडून आले. अंदमानच्या कारागृहात आपलं संपूर्ण तारुण्य आपलं आयुष्य घालवलं.
असे अगणित लोकं आहेत ज्यांनी देशासाठी त्याग केला आहे. आपण काहीतरी करू शकतो ही भावना आपल्यात हवी. आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळच एखादी सरकारी शाळा असेल. कधीतरी अर्ध्या तासासाठी तिथे जा तरी त्या मुलांशी गप्पा मारा; हळूहळू तुमचे मन तिथे रमेल. या मुलांची शिकण्याची इच्छा आहे. तिथले शिक्षक शिकवत नसतील तर मी शिकवेन. तुम्ही स्वतः एक संघटना आहात. कुठल्या मोठ्या संघटनेची आवश्यकता नाही, खूप मोठ्या डोनेशनची गरज नाही. खूप मोठी संस्था सुरु करण्याची गरज नाही. फक्त निश्चय करा मला करायचे आहे.
गो रक्षणाच्या नावाखाली हे जे काही लोकं आपली दुकानं उघडून बसले आहेत; मला इतका राग येतो. गो- भक्त निराळे आहेत, गो- रक्षक निराळे आहेत. पूर्वीच्या काळात तुम्ही पहिले असेल की बादशहा आणि राजांमध्ये युद्ध व्हायचे.त्यावेळी बादशहा काय करायचे आपल्या फौजेच्या पुढे गाई ठेवायचे.राजाला चिंता वाटायची की जर युद्धात गाईला शस्त्र लागले आणि ती मेली तर गो हत्येचे पाप लागेल आणि याच द्विधा मनस्थितीत तो लढाई हरायचा. बादशहा देखील मुद्दामहून गाय ठेवत असत.
मी बघितले आहे काही लोकं रात्रभर समाज विघातक कार्य करतात; परंतु सकाळी गो रक्षकाचे सोंग आणतात. मी राज्य सरकारांना विनंती करतो की, हे जे तथाकथित गो रक्षक आहेत त्यांची जरा यादी तयार करा. यातील ७० ते ८० टक्के लोकं हे असे गोरख धंदे करणारे असतील ज्याला समाजात मान्यता नाही. परंतु आपल्या ह्या वाईट कृत्यांना लपवण्यासाठी हे लोकं गो रक्षकाचे सोंग आणतात. आणि खरंच जर ते गो सेवक असतील तर त्यांना मी एक विनंती करतो की त्यांनी एक काम करावे. गाईंचा सर्वात जास्त मृत्यू कत्तल केल्यामुळे नाही तर प्लास्टिक खाल्यामुळे होतो. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की गाय कचऱ्यामधील प्लास्टिक खाते आणि त्यामुळे गाय मारते. मी जेव्हा गुजरात मध्ये होतो तेव्हा पशु आरोग्य शिबीर आयोजित करायचो. मोठे मोठे शिबीर आयोजित करायचो. अशा शिबिरांमध्ये अशा आजारी गाईंचे ऑपरेशन व्हायचे. मी एकदा अशाच एका शिबिरात गेलो होतो तेव्हा तिथे एका गाईच्या पोटातून २ बादली भरून प्लास्टिक निघाले होते. आता हे जे समाजसेवा करू इच्छितात ते गाईंचे प्लास्टिक खाणे तरी बंद करू देत, लोकांना प्लास्टिक फेकण्यापासून रोखले तरी खूप मोठी गो सेवा होईल.
आणि म्हणूनच स्वयंसेवी संघटना, स्वयंसेवक हे दुसऱ्यांना त्रास द्यायला नसतात, दुसऱ्यांना दाबण्यासाठी नसतात. आपण कधी आपल्या वर्तमानपत्रवाल्याला हे कधी विचारले नसेल की काय सुरु आहे, मुलं किती आहेत, कितवीत शिकतात. दुधवाला येतो घरत पिशवी ठेवून निघून जातो त्याची देखील विचारपूस केली नसेल. पोस्टमन येतो टपाल देवून निघून जातो त्याची देखील विचारपूस केली नसेल. कधी तरी आपल्या आसपास राहणाऱ्या सामन्य जीवन जगणाऱ्या माणसांची विचारपूस करा, त्यांना त्यांच्या मुलांबद्दल त्यांच्या शिक्षणाबद्दल विचारा. तुम्ही बघाल की, सेवा करण्यासाठी पंतप्रधानांच्या भाषणाची गरज नाही लागणार. तुमच्या शेजारी उभी असलेली व्यक्ति तिचे उत्तरच तुम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा देवून जाईल आणि तुम्ही जर हे केले तर मला विश्वास आहे तुम्ही देशाच्या हितासाठी खूप काही करू शकता. तुम्हाला सगळ्यांना भेटून मला आनंद वाटला. ज्या लोकांचा सम्मान करण्याची आज मला संधी मिळाली, ज्यांनी योगदान दिले आहे, ज्यांनी काही साध्य केले आहे त्या सर्व माझ्या मित्रांचे मी अभिनंदन करतो. परंतु अजून जे लोकं चांगले कार्य करीत आहेत, मेहनत करत आहेत, याच्यासोबत जोडले जात आहेत यामुळेच सरकारमध्ये चैतन्य येते. आज हे तंत्रज्ञानातील सर्वात मोठे सशक्तीकरण आहे. एक काळ होता जेव्हा लोकं आम्हाल उपदेश द्यायचे. हे चांगले हे वाईट, तुम्ही हे करा ते करा, बरंच काही सांगायचे, देशवासियांना सांगायचे, नागरिकांना सांगायचे, खेळाडूंना सांगायचे प्रत्येकाल सांगायचे.
आज तुमच्या हातात एक अशी ताकत आली आहे की तुम्ही देखील त्या व्यक्तिला सांगता, तू खोट बोलत आहेस. हि ताकत काही कमी नाही. एक काळ असा होता की पंतप्रधान काही बोलले की देशाला काही तरी संदेश दिला, त्यांनी दिला लोकांनी ऐकला. चांगला वाटला तरी ठीक आहे नाही वाटला तरी ठीक आहे. आज पंतप्रधान काही बोलले तर तिसऱ्या मिनटाला येते की हे सर्व ठीक आहे पण १० वर्षापूर्वी तुम्ही असे वागत होतात. ही ताकत आहे.
सार्वजनिक जीवनात आम्ही टीका ऐकूनच मोठे झालो आहोत आणि हे लोकशाहीचे वैशिष्टय आहे. परंतु खूप लोकं आहेत ज्यांना टीका सहन होत नाही. त्यांना लगेच ताप येतो. मी अचंबित होतो, कारण आत्तापर्यंत त्यांना उपदेश देण्याचीच संधी मिळाली होती. आपण सर्वांनी टीका स्वीकारून टीका गेली हे समजून घेतले पाहिजे. मला मान्य आहे की हे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ आहे, जे आपल्याला शिक्षित करते. आपण कोणाच्यातरी माध्यमातून आपल्यातल्या वाईट गोष्टी जाणून घेऊ शकतो नाही तर आजूबाजूचे मित्र देखील संकोच करतात की सांगू की नको सांगू, सांगू की नको सांगू वाईट वाटायचे. परंतु आज तर तो बोलतो, मोदी जी बाकी सगळं ठीक होते पण उत्तर खूप मोठी होती, तो हे लिहू शकतो त्यात त्याला काही संकोच वाटणार नाही. हे हि सांगेल की मोदीजी तुम्ही हे सांगितले परंतु हे बरोबर नाही. हेच सशक्तीकरण आहे. MyGov द्वारा लोक सहभागाने सरकार चालवण्याचा मानस आहे. लाखो लोकं जोडली आहेत करोडो लोकं जोडली जावीत ही अपेक्षा आहे आणि तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांनी हे सर्व शक्य होईल.
खूप खूप धन्यवाद.
BG/SM/AK
The Prime Minister arrives for the Town Hall programme. #MydayatMyGov pic.twitter.com/decjYQScBd
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
The Prime Minister meeting some of those people who have shared their views during #MannKiBaat programme. pic.twitter.com/xdcWVJNTrP
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
The PMO App has been launched by Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/oEIVa5ouYe
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
PM meets the youngsters who developed the PMO App. pic.twitter.com/NqDpobxm2g
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
The spirit of a democracy is incomplete if one thinks the citizen's role stops at voting. Participative democracy is essential: PM
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
Often, Governments think only about winning the next election and then their policies are also shaped accordingly: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
'Last mile delivery' is as important as policies. The benefits must reach the intended beneficiaries: PM @narendramodi #MydayatMyGov
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
Good governance means those processes that are redundant do not exist: PM @narendramodi #MydayatMyGov
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
Grievance redressal systems are the biggest strengths of a democracy: PM @narendramodi #MydayatMyGov
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
India is among the fastest growing economies in the world: PM @narendramodi #MydayatMyGov
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
If there is one sector that can power the economy it's the agriculture sector: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
The unique spirit of our villages must remain and at the same time they must have facilities associated with cities: PM
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
Khadi for nation and Khadi for fashion, this must be our guiding principle: PM @narendramodi #MydayatMyGov
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
Questions on foreign policy, tourism and on volunteering being asked now. There is also a question on the 'Narendra Modi Mobile App.'
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
Our foreign policy is only about India First: PM @narendramodi #MydayatMyGov
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
We are seeing an increase in tourist arrivals in India: PM @narendramodi #MydayatMyGov
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016
A spirit of social service is a part of our culture. We have always helped people in times of need: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 6, 2016