Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील प्रत्यार्पण करारावर स्वाक्षऱ्या करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.

या करारामुळे दहशतवादी, आर्थिक गुन्हेगार आणि अफगाणिस्तानमध्ये गेलेल्या तसेच तेथून आलेल्या गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाला मदत मिळणार आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha