Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एक्झिम बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्यातल्या सहकार्य विषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


एक्झिम बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्यातल्या सहकार्य विषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. ब्रिक्स आंतर बँक सहकार्य यंत्रणेमार्फत हे सहकार्य करण्यात येणार आहे. या प्रस्तावामुळे ब्रिक्स देशातला व्यापार आणि आर्थिक संबंध वृद्धिंगत होणार आहे. ब्रिक्स राष्ट्रांमधल्या यामधे सहभागी होणाऱ्या संस्थांचा या सामंजस्य करारामुळे फायदा होणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्यांना कौशल्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणे सुलभ होणार आहे.

ब्रिक्स राष्ट्रांमधे व्यापार आणि आर्थिक संबंध वृद्धिंगत व्हावेत, यासाठी ब्रिक्स राष्ट्रांमधल्या पाच बँकांनी ब्रिक्स आंतर बँक सहकार्य यंत्रणा निर्माण केली आहे.

N. Sapre/N. Chitale /D. Rane