Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांकडून ज्येष्ठ पार्श्वगायिका एस. जानकी अम्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात पार्श्वगायिका एस. जानकी अम्मा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले की, त्यांच्या निधनामुळे संगीत आणि संस्कृती विश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. विविध भाषांतील त्यांची गीते अनेक पिढ्यांमध्ये लोकप्रिय होती आणि त्यांनी आपल्या अप्रतिम माधुर्य, सहजता तसेच अष्टपैलू गायकीच्या बळावर प्रत्येक भावनेला आवाज दिला.

मोदी म्हणाले की, त्यांच्या सुरेल गीतांची जादू येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत रसिकांना मंत्रमुग्ध करत राहील.

पंतप्रधानांनी X वर लिहिले;

“प्रख्यात पार्श्वगायिका एस. जानकी अम्मा यांच्या निधनामुळे संगीत आणि संस्कृती विश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. विविध भाषांतील त्यांची गीते अनेक पिढ्यांमध्ये लोकप्रिय होती. त्यांनी आपल्या अप्रतिम माधुर्य तसेच अष्टपैलू गायकीच्या बळावर प्रत्येक भावनेला आवाज दिला. त्यांच्या सुरेल गीतांची जादू येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत रसिकांना मंत्रमुग्ध करत राहील. दुःखाच्या या क्षणी त्यांच्या कुटुंबीयांप्रती, असंख्य चाहत्यांप्रती आणि संपूर्ण संगीत क्षेत्राप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. ॐ शांती.”

***

आशिष सांगळे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]