Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मिझोराममध्ये दगडखाण कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममध्ये दगडखाण कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी (PMNRF) मधून मदत देखील जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

मिझोराममधील दगडखाणीमध्ये झालेल्या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. या दुर्घटनेतल्या मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदतनिधी मधून 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल-पंतप्रधान

***

Sonal T/Vikas Y/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai