पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान अंतराळाच्या शांततापूर्ण वापरासाठीच्या सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली.
दोन्ही देशांमध्ये शिक्षण, कृषी, हवामान अंदाज, दूरसंचार, ग्रामीण आरोग्य, स्वच्छता, शहर विकास, रिसोर्स मॅपिंग नेव्हिगेशन, दूर संवेदी आणि अन्य क्षेत्रात अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक सहकार्य पुरवण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या कराराचा दोन्ही देशांना पुढील प्रकारे लाभ होईल:-
१. अफगाणिस्तानात अंतराळ क्षेत्राचा विकास
२. प्रगत अंतराळ तंत्रज्ञान असलेला देश म्हणून भारताची असलेली ख्याती अधिक बळकट होईल, ज्याची अन्य देशांनाही मदत होईल
३. अंतराळ क्षेत्रात अफगाणिस्तान स्वयंपूर्ण होईल
४. उभय देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध आणि विश्वास दृढ होण्यास मदत होईल
५. अफगाणिस्तानच्या धोरणात्मक अंतराळ आणि दूरसंचार क्षेत्रात भारताला पाय रोवता येतील.
याशिवाय, दोन्ही देशांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकास संशोधन क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान आधारित रोजगाराला चालना मिळेल. मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात उत्तम दूरसंचार आणि इंटरनेट जोडणीमुळे विविध क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना मिळेल.
BG/Kane