Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारत- व्हिएतनाम दरम्यान माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि व्हिएतनाम यांच्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली.

उभय देशांच्या कायदे आणि नियमानुसार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात समानता आणि परस्पर हिताच्या आधारे दीर्घकालीन आणि शाश्वत सहकार्य विकसित करणे हा या कराराचा उद्देश आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ विकास क्षेत्रात संस्थात्मक आणि क्षमता निर्मितीच्या माध्यमातून दोन्ही देशांना मोठा लाभ होईल.

पाच वर्षांसाठी हा सामंजस्य करार लागू राहील. तसेच उभय देशांच्या लेखी परवानगीने त्याचे नूतनीकरण करता येईल. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला संयुक्त कृती गट स्थापन करून या कराराची अंमलबजावणी केली जाईल.

BG/Kane