Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी.

सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी.


सेशेल्सचे राष्ट्रपती महामहीम डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सेशेल्सच्या स्वातंत्र्यदिनाच्या 50 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. सेशेल्समधील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

हा स्वातंत्र्यदिन सोहळ्यासोबतच भारत आणि सेशेल्स दरम्यानच्या राजनैतिक संबंधांना देखील 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा विशेष प्रसंगाचे औचित्य साधून सेशेल्सच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय संचलनात भारतीय सशस्त्र दलाची तुकडी देखील सहभागी झाली होती. सहभागी झालेल्या या भारतीय तुकडीमध्ये आसाम रायफल्स, भारतीय नौदल आणि भारतीय नौदलाच्या मार्चिंग बँडच्या जवानांचा समावेश होता, भारताच्या या सहभागातून दोन्ही देशांमधील संरक्षण क्षेत्र विषयक दीर्घकालीन भागीदारीही अधोरेखित झाली. या सोहळ्याचा एक भाग म्हणून आणि प्रस्थापित परंपरेला अनुसरून भारतीय नौदलाची आयएनएस तर्कश आणि आयएनएस इक्षक ही जहाजे पोर्ट व्हिक्टोरिया बंदरात दाखल झाली होती.

या सोहळ्यातील पंतप्रधानांच्या सहभागातून दोन्ही देशांमधील दृढ भागीदारी आणि दीर्घकालीन मैत्री देखील अधोरेखित झाली.

***

NehaKulkarni / TusharPawar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai