Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वच्छता मोहिमेत पंतप्रधान सहभागी

स्वच्छता मोहिमेत पंतप्रधान सहभागी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज संपूर्ण देश स्वच्छता मोहीमेत सहभागी होत आहे.  प्रत्येकाने स्वच्छतेसाठी एक तास समर्पित केला आहे जो देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यात मदत करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंकित बैयनपुरिया यांच्यासह या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. अंकित हा फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे.

पंतप्रधानांनी त्यांच्या X पोस्टवर एक व्हिडिओ सामायिक केला आहे ज्यामध्ये ते आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छता आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल सांगताना दिसतात. पंतप्रधानांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील दिनचर्येबद्दलही सांगितले आणि अंकितच्या तंदुरुस्तीसंबंधी सूचनाही जाणून घेतल्या.

एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“आज, ज्याप्रमाणे देश स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करत आहे, अंकित बैयनपुरिया आणि मी देखील तेच केले!  स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन आम्ही तंदुरुस्ती आणि निरामय आरोग्य याबाबतही बोललो.  हे सर्व त्या स्वच्छ आणि निरोगी भारतासाठी  आहे! @baiyanpuria”

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai