Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी उत्तराखंडमधल्या लोकांना राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा


पंतप्रधानांनी उत्तराखंडच्या राज्य स्थापना दिनानिमित्त राज्यातल्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, देवभूमी उत्तराखंड आध्यात्मिक चेतना आणि विलक्षण नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहे. या राज्याची, निसर्गरम्य पर्वतीय क्षेत्र, पवित्र नद्या, पूजनीय चारधाम आणि गौरवशाली सांस्कृतिक वारसा, यांमुळे वैशिष्ठ्यपूर्ण ओळख आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

राज्यातल्या परिश्रमी, प्रतिभाशाली आणि प्रगतिशील लोकांच्या सक्रिय भागीदारीमुळे उत्तराखंड आज प्रत्येक क्षेत्रात विकासाची नवी शिखरे गाठत आहे, असे कौतुक पंतप्रधानांनी केले आहे. निसर्ग आणि संस्कृतीप्रेमींचा हा प्रदेश वेगाने निरंतर प्रगती करत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि या राज्यातल्या लोकांना सुख, शांती व समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे;

उत्तराखंड स्थापना दिनानिमित्त राज्यातील सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा!

आपली ही देवभूमी आध्यात्मिक चेतना आणि अद्भुत नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहे. नयनरम्य पर्वतीय प्रदेश, पवित्र नद्या आणि पावन चारधाम यांसोबतच समृद्ध सांस्कृतिक वारशामुळे या राज्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राज्यातील कष्टाळू, प्रतिभावान आणि प्रगतिशील नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे उत्तराखंड आज प्रत्येक क्षेत्रात विकासाची नवी शिखरे गाठत आहे. निसर्ग आणि संस्कृतीवर प्रेम करणारे हे राज्य प्रगतीच्या मार्गावर सातत्याने अधिक वेगाने पुढे जात राहील, असा मला विश्वास आहे.

हा विशेष दिवस राज्यातील सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा!

***

NehaKulkarni / SonaliKakade / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai