पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बस्तरमध्ये करनपूर इथल्या कोब्रा ऑपरेशन्स तळावर (CoBRA Operations Base) जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा केल्याची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
सुरक्षा दलांच्या समर्पणामुळेच बस्तरमध्ये दिवाळीच्या उत्सवाची भावना प्रज्वलित होऊ शकल्याचे या उत्साहातून दिसून आले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. नक्षलवाद आता इतिहासजमा झाला आहे, विकास हीच पुढची दिशा आहे असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण खास आणि संस्मरणीय असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश
बस्तरमधील दिवाळी… याचे सर्व श्रेय आपल्या सुरक्षा दलांना!
नक्षलवाद आता इतिहास झाला आहे.
विकास हीच पुढची दिशा.
आजचा दिवस खास आणि संस्मरणीय होता.
Diwali in Bastar…all thanks to our security forces!
Naxalism is history.
Development is the way ahead.
Today was special and memorable. https://t.co/cHok2iVtd8
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2026
बस्तरमध्ये दिवाळीचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला!
Diwali spirit on full display in Bastar! https://t.co/KGAWwb12CB
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2026
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]